Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

एकता बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य व छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड माळशिरस तालुक्याच्या वतीने ईद-ए-मिलाद व अनंत चतुर्दशी निमित्त खाऊ वाटप

 


विशेष प्रतिनिधी अकलूज

कासिम--- मुलानी

टाइम्स 46 न्यूज मराठी

                         अकलूज येथील एकता बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य, व शिवछत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड माळशिरस तालुक्याचे वतीने ईद-ए-मिलाद व अनंत चतुर्दशी निमित्त हिंदू मुस्लिम बांधवांना खाऊ वाटप करण्यात आले . राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली एकता बहुउद्देशीय संस्था व शिवछत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड माळशिरस तालुका यांच्यावतीने आणि अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच- शिवतेजसिंह मोहिते पाटील व अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी- दयानंद गोरे यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला        



         एकता बहुउद्देशीय संस्था व शिवछत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड च्या वतीने आजतागायत अनेक सामाजिक व विधायक कामास प्राधान्य दिले व अनेकांना मदतीचा हात दिला असुन हे उल्लेखनीय कार्य आहे



या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष- जावेद (बाबा) तांबोळी अकलूज ग्रामपंचायत चे माजी सदस्य- दादा( काशीम) तांबोळी ,अतिक जमादार, जावेद मदारी, एहसान मुलाणी, मनोज पोटे ,दादा शेख, रफिक मदारी ,सरफराज काझी , करण भंडारे ,अजहर जमादार, फिरोज तांबोळी ,तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा