Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

अरब भूमी मधील दैवी वरदान प्राप्त व्यक्तिमत्व आणि जागतिक शांतीदूत म्हणजे- प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर(स.अ.) होय ---------शेख वाहिद ,औरंगाबाद

 


टाइम्स 45 न्यूज मराठी

अकलूज --सोलापूर

                 इस्लाम धर्माचे संस्थापक व ईश्वराचे दूत म्हणजेच पैगंबर मुहंमद (स. अ. स.)यांचा जन्मदिवस.

 जवळपास पंधराशे वर्षापूर्वी पवित्र शहर मक्का (सौदी अरेबिया)येथे जन्म.

त्यावेळेस अरब जनसमुदाय हा अनेक अनिष्ठ चालीरीती व आदिवासी साम्य जीवनशैली, जंगली -क्रूर स्वभाव या पद्धतीने जीवन जगत होता.

स्त्रीयांना समाजात दुय्यम स्थान होते.

अरबी लोक हजारो कबिल्यात समूहात विखुरला होता. 

प्रत्येक कबिला(समूह)हा इतर कबिल्यावर वरचढपणा करण्याचा प्रयत्न 

करत होता.

अशा या विखुरलेल्या असंस्कृत समाजात मुहम्मद पैगंबर(स अ स) यांनी बालपणीपासून ते तारुण्यापर्यंत एक सुसभ्य व सुसंस्कृत जीवन जगून अरब भूमीत आदर्श निर्माण केला.

 त्यांच्या शहरात व आजूबाजूच्या अरब राष्ट्रात ते अमीन म्हणचेच इमानदार व एकवचनी म्हणून त्यांची ख्याती निर्माण झाली.

 ते अरब भूमीतले दैवी वरदान व्यक्तिमत्व म्हणून उदयास आले व सर्वदुर प्रसिद्ध झाले .

ते नेहमी अल्लाह च्या भक्तीमध्ये लीन होऊन ध्यानमुद्रा करणेसाठी सलग एक दोन आठवडे मक्का जवळील जबलेनूर या अतिउंच डोंगरा वरील गारेहिरा नावाच्या दगडी बोगद्यात एकांतवास स्वीकारीत.

वयाच्या चाळिसाव्यावर्षी त्यांना दिव्यप्राप्ती व ईश्वरी साक्षात्कार झाला.

 तदनंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःस धर्मोपदेशक व समाजउपदेशक म्हणून झोकून दिले. 

त्यांनी त्याकाळात जो सत्यमार्ग व जीवनमार्ग दाखविला तोच इस्लाम होय.

सदरील सत्यमार्ग उपदेश हा त्याकाळातील असंस्कृत अरबसमाजासाठी कुतूहलाचा विषय ठरला. 

त्याआधारे आत्मशांती व मानवकल्याण होत असल्याने चे निष्पन्न झाले.

 1) एक निरंकारी ईश्वराचीभक्ती - उपासना ,केवळ त्यासाठीच उपासना -नमन व वंदन 

2) सभोवतालच्या मानवांची सेवा व मानवकल्याणसाठी त्याग

 3) सत्य आचरण व सदरील आचरणासाठी इतरांना निमंत्रण

 4) कमकुवत व्यक्ती वर दया व आपसात यथोचित न्याय

 5) जीवनात केलेल्याआचरणानुसारच मृत्यूनंतर ईश्वराचा न्याय व मुक्ती यावर विश्वास

 ही मुहंमद पैगंबर(स अ स) यांची

मूळ पंचसूत्री.

या पंचसूत्रीच्या प्रचार प्रसारामुळेच त्याकाळी अरबसमाज सुसंस्कृत झाला.

 त्यामुळेच आजूबाजूच्या अनेक अरब देशात सुध्दा इस्लाम चा प्रसार वेगाने झाला. 

मुहंमद पैगंबर (स अ स) यांचा मृत्यू 63 व्या वर्षी मदिना या पवित्र शहरात झाला.

दरवर्षी 45 लाख मुस्लिम धर्मीय सौदी अरेबिया येथे हज यात्रे साठी जातात त्यामध्ये मक्का व मदिना शहरात हजेरी बंधनकारक असते.

 पैगंबर(स. अ. स.) यांच्या जिवंतपणी 15 देशात इस्लामचा प्रचार व प्रसार झाला होता.

 त्यांच्या मृत्यू पाश्चात्य इस्लाम धर्माचे चार मूळ खलिफा झाले.

 चौथे खलिफा हजरत अली यांचा मृत्यू पैगंबर यांच्या मृत्यू नंतर 35 ते 38 वर्षांनी झाला.

 तोपर्यंत 26 देशात इस्लामचाप्रचार व प्रसार झाला होता.

 आज जगाच्या पाठीवर 50 इस्लामिक देश असून एकूण 71 देशांमध्ये इस्लाम धर्मीय म्हणजेच मुस्लिम राहतात.

जगाच्या पाठीवरील 740 कोटी लोकसंख्येपैकी 111 कोटी मुस्लिम धर्मीय असून ही क्रमांक 2 ची लोकसंख्या असून 185 कोटी ख्रिश्चन धर्मीय असून जगाच्या पाठीवर सर्वात जास्त ख्रिश्चन धर्मीय आहे.

इंडोनेशिया देशात 21कोटी मुस्लिम भारतात 19 कोटी मुस्लिम असे 40 कोटी मुस्लिम फक्त या दोन देशांत आहे.

 कुरान हे इस्लाम चे पवित्र धर्मग्रंथ असून त्यामधील सुरे (श्लोक) काफेरून मध्ये स्पष्टपणे लिखित आहे की...

तुम्हाला तुमचा दिन (धर्म) मुबारक मला माझा दिन(धर्म)मुबारक.....

 म्हणजेच वेगवेगळ्या धर्मीयांनी आप आपल्या धर्माप्रमाणे आचरण करावे ,आपला धर्म इतरांवर लादू नये.

इस्लामिक तत्वज्ञान नुसार पैगंबर यांची पंच सूत्री नुसार जीवन जगायचे असेल तर स्वइच्छेने व स्वयप्रेरनेनेच इस्लामची दीक्षा घेतली जाऊ शकते.

   इस्लाम धर्मात दारू पिणे,पुतळा बनविणे व बसविणे ,गाजावाजा/हर्षोउल्हास करून वाढदिवस साजरा करणे निषिद्ध असल्याने पंच्याहत्तर देशांत पैगंबर (स. अ. स) यांचा जन्मदिवस फक्त अल्लाहच्या भक्तिभावाने व साधेपणाने साजरा केला जातो.

  ईदेमिलाद म्हणचेच पैगंबर (स अ स) यांच्या जन्म दिवसाचे स्मरण करून त्यांना हजारो दरुदो -सलाम सादर करतो.


     -इंजि शेख वहिद(PWD)

      (औरंगाबाद,महाराष्ट्र)

_____________________________________________








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा