Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १० सप्टेंबर, २०२३

वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

 माळीनगर येथील "महात्मा फुले पतसंस्थे "ची 30 वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न . सभासदांना 15 टक्के लाभांश जाहीर


अकलूज -----प्रतिनिधी

केदार---लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी

मो-9890 095 283

                    माळीनगर येथील महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था माळीनगर या संस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी सभासदांना १५ टक्के लाभांश (डिव्हीडंड) देण्यात येणार असल्याचे संस्थेचे व्हा.चेअरमन महादेव एकतपुरे यांनी यावेळी जाहीर केले.

             महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे वाटचाल करीत असलेल्या या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच माळीनगर येथील सौभाग्य मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते.सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हा.चेअरमन महादेव एकतपुरे हे होते.प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सभासद विजय नेवसे व मिलिंद गिरमे यांचे हस्ते करण्यात आले.

       यावेळी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक किरण गिरमे,अंकुश फुले,निळकंठ भोंगळे,चंद्रकांत जगताप,सुरज वाघमोडे,कृष्णा भजनावळे तसेच माळीनगर साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश गिरमे,व्हा.चेअरमन राहुल गिरमे,विशाल जाधव,निखिल कुदळे,शुगरकेनचे चेअरमन अमोल गिरमे,व्हा.चेअरमन कपिल भोंगळे,सुरेंद्र बधे,सुरेश राऊत,मनीष रासकर,सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी प्रकाश गिरमे,व्हा. चेअरमन नितीन इनामके,खजिनदार पृथ्वीराज भोंगळे,संचालक अजय गिरमे, दिलीप इना शमके,माळीनगर मल्टिस्टेटचे संचालक बाळासाहेब सोनवणे,प्राचार्य प्रकाश चवरे,पर्यवेक्षक रितेश पांढरे, राजीव देवकर,सुनील जवरे आदी सभासद उपस्थित होते.

        यावेळी पतसंस्थेचे सचिव योगेश कचरे यांनी सभेपुढील विषय तसेच ताळेबंदाचा आढावा घेतला.यामध्ये पतसंस्थेची स्थापना १९९४ साली झाली असून सभासद ५३० संख्या आहे.संस्थेचे भाग भांडवल १ कोटी ३ लाख ८३ हजार एवढे आहे.संस्थेत १७ कोटी २९ लाख २६ हजार रुपये ठेवी असून खेळते भांडवल ३२ कोटी १५ लाख आहे.संस्थेची वार्षिक उलाढाल १६७ कोटी असून कर्ज वसुली ७८.३५ टक्के एवढी आहे. संस्थेचा तरतूदपूर्व नफा १ कोटी ७१ लाख व निव्वळ नफा ५८ लाख ७७ हजार एवढा असून संस्थेला 'अ' ऑडिट वर्ग मिळाला असल्याचे योगेश कचरे यांनी सांगितले.

      यावेळी सभासदांनी अहवाल व ताळेबंदावर विचारलेल्या प्रश्नांना संस्थेचे व्हा.चेअरमन महादेव एकतपुरे व सचिव योगेश कचरे यांनी समाधानकारक उत्तरे दिली.सभासदांना पतसंस्थेच्या वतीने एक मोठी प्रवासी बॅग भेट देण्यात येणार असून त्याचे वाटप २० सप्टेंबर पासून करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर केले.

        हि सभा यशस्वी करण्यासाठी सचिव योगेश कचरे,हमीद कोरबू,ज्ञानेश्वर व्यवहारे,युवराज कापले,सनी भुजबळ,सूरज घोगरे,योगेश म्हेत्रे,सागर गिरमे,अन्वर काझी यांनी परिश्रम घेतले.

          संचालक सूरज वाघमोडे यांनी सर्वांचे स्वागत केले तर शेवटी व्हा.चेअरमन महादेव एकतपुरे यांनी आभार मानले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा