Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १० सप्टेंबर, २०२३

ब्लॅकमेलिंग" करणाऱ्या तरुणांना कंटाळून" आत्महत्या

 "ब्लॅकमेलिंग" करणाऱ्या तरुणांना कंटाळून" आत्महत्या "करणाऱ्या तरुणींना- समाजप्रबोधनाची गरज----इक्बाल  मुल्ला (पञकार ) सांगली


संपादक----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9730 867 448

                    सांगलीतील 100 फुटी रोड कॉर्नर ...स्थळ रेग्युलर हाईट्स .ऐमरॉन बॅटर समोर ... एक रम्य संध्याकाळ मुस्लिमांच्या "मगरिब" ची अजान धीरगंभीर शांतता भेदत "भक्तिमय" स्वरूप घेत असताना, पावसाचे थेंब "दवबिंदूप्रमाणे" मनाला "मोहरून" जात असताना , या रोडवरून ..एक तरुणी (पाठीवर गुलाबी सॅक अडकवलेली ) चालत - चालत जात असते . तू मला फोन करू नकोस ,नाहीतर मी आत्महत्या करेन असे "मोबाईल" वरून उद्वेगाने सांगत ,अश्रूंचा महापूर रोखत तिची "पाऊले" "अडखळत" पडत असतात . तिची आर्तहाक समोरच्या पुरुषी "निर्दयी" मनाला भलेही पाझर फोडत नसतील , पण माझ्यासारख्या संवेदना जपणाऱ्या शोधपत्रकाराला ती नक्कीच जाणवली . कारण त्या रोडवर" बॅटरी" घेण्यासाठी त्या दुकानासमोर गाडी पार्क करून दुकानात जात असताना ,ती तरुणी माझ्या अगदी जवळून पुढे गेली आणि एका दुर्दैवी -भीषण भविष्याचा मी साक्षीदार झालो...! 



वाचकहो ..असे कित्येक प्रकार भारतात घडत नाहीत का ?? नैसर्गिक पौंगडावस्था मध्ये "पदार्पण" करणाऱ्या या "उमलत्या" कळ्यांवर, तरुणीवर अन्याय -अत्याचार - बलात्कार होत नाहीत का ?? प्रत्येक महिन्यात एखादी तरुणी "आत्महत्या" करण्याचे ,नैराश्याची "शिकार" होत टोकाचे पाऊल उचलत असेल ?? वृत्तपत्र - मीडिया हे "भीषण वास्तव" समाजासमोर दाखवत असतात .याला जबाबदार कोण ?? समाज - पालक - तरुणी - मोबाईल की आणखी कोण ??? समाजमाध्यमातून तरुणीवर समुपदेशन झाले तर असे प्रकार निश्चितच "रोखता" येऊ शकतात .

आज पालकांनी मुली -तरुणींना अँड्रॉइड मोबाईल देऊन व्यभिचाराला "आमंत्रण" देण्याचे - व्यासपीठ उपलब्ध करून तर दिले नाही ना ?? असा प्रश्न उपस्थित होत आहे .



आपली मुलगी क्लास ला जाते , किती वाजता येते ..याची किंचितही माहिती पालकांना नाही .कित्येक लॉज मध्ये तरुण -तरुणी संध्याकाळी ही पाठीला सॅक अडकवून शरीराची भूक "शमवण्यासाठी" येत असतात . एकदा लॉज च्या चक्रव्यूहात अडकलेले जोडपे सहजासहजी सुटू शकत नाहीत . त्यातून अन्याय -अत्याचार - निर्वस्त्र शरीराचे फोटो काढून तरुणीचे ब्लॅकमेलिंग असे प्रकार सुरु होतात . त्यातून "सुटका" करून घेण्यासाठी "आत्महत्येचे" "टोकाचे पाऊल" तरुणी कडून उचलले जाते .  

जीवन "अनमोल" आहे .त्यामुळे नकारात्मक दुर्दैवाची पाऊलवाट मुलींनी स्वीकारू नये .जीवन "विस्तीर्ण -प्रगल्भ - आनंदी आहे . तरुणींनी पालकांशी सकारात्मक "चर्चा" करत मार्ग काढावा. पालकांनीही तरुणींना "दिशादर्शक जीवनपद्धती" व चांगले संस्कार दिले तर असे प्रकार "रोखता" येऊ शकतात . 

तरुणाच्या ब्लॅकमेलिंग मुळे तरुणी आत्महत्येचे "पाऊल" उचलत असतील तर याआधी समाजानेही "डोळे" उघडे ठेऊन या "तरुणाई "ला रोखले पाहिजे . सांगली - कोल्हापूर रोडवर दररोज कॉलेज चे 10-20 तरुण - तरुणी पाठीला सॅक अडकवून सांगली -मिरजेतील लॉज मध्ये गेलेले आढळतील. यातून "बोध" काय घ्यायचा?? आज अन्य तरुणी असेल ,उद्या आपलीच "लेक" अशा प्रकारात सापडली तर ??? 

तात्पर्य आपण समस्त " मानवजातीचे पालक आहोत ,या दृष्टीकोनातून अशा प्रकाराला रोखले पाहिले .व प्रत्येक पालकांनी "क्लास व कॉलेजला" जाणाऱ्या तरुणीला स्पष्टपणे सांगत , सहजपणे येणाऱ्या अमिषाला - मोहाला " नकार " द्यायला "शिकवायला" हवे . या गलिच्छ प्रकाराला "पायबंद" घालायचा असेल तर ,तरुणीवरील अतिविश्वास -स्वेर जीवनपद्धती बदलायला हवी. आज एक तरुणी आत्महत्येचा विचार करते ..उद्या दुसरी करायला नको ...म्हणूनच पालकांच्या डोळ्यात " अंजन" घालण्यासाठी हा लेख लिहीत आहे . पालकांना व स्वतःला शहाणे करणारे समाजप्रबोधन होणे ही काळाची गरज आहे .

( इस्लाम मध्ये मुलगी "वयात" आल्यावर" विवाह व्हावा असे प्रेषितांनी सांगितले आहे .कधी कधी हेच योग्य व काळाची गरज आहे असे वाटते) असो , धन्यवाद !



इकबाल मुल्ला ( पत्रकार) संपादक - सांगली वेध , 

संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली मोबाईल - 8983587160



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा