Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १० सप्टेंबर, २०२३

विखे पाटील, यांचा तीव्र जाहीर निषेध-

 धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या 'पालकमंत्री विखे पाटील, यांचा तीव्र जाहीर निषेध----बच्चन साठे


संपादक----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9730 867 448

                    सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर येथे आले असता धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रश्नांवर विखे पाटील यांना निवेदन देत असताना धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी विखे यांच्यावर भंडारा उधळला म्हणून पालखमंत्राचे अंगरक्षक आणि पाळलेल्या भाजपच्या बगलबच्यांनी धनगर समाज्याच्या कार्यकर्त्यांना खाली पाडुन लाथा बुक्यांचा मारहाण केली ही घटना अतिशय क्रुर आणि निंदनीय आहे मतदानावेळी पालकमंत्र्यांना जनतेच्या पायाची धुळ चाखायला आवडते मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,खंडोबा,बिरोबा,बाळू मामा,यांच्या भंडाऱ्याची ऐवढी अल्रजी कुठुन आली म्हणजेच विखे पाटील यांना धनगर समाजाच्या मागण्या मान्य नाहीत त्यामुळे असा प्रकार घडला असावा असा प्रश्न उपस्थित होतो राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मुळे देव देवता मंदिरे आज उभा आहेत भंडारा म्हणजे धनगर समाज आणी इतर समाज्याच्या भावना आहेत प्रत्येक वेळी हे समाजबांधव भंडारा उधळुन जल्लोष साजरा करतात त्याच पद्धतीने विखेना निवेदन देताना ह्या बांधवांनी भावनिक होऊन विखेंवर भंडारा उधळला म्हणून विखेंच्या पाळलेल्या बुजगावण्यांनी कार्यकत्यांना मारहाण केली ज्याला भंडारा चालत नाही तो कसला पालकमंत्री तो पालकमंत्री म्हणून आम्हाला चालणार नाही धनगर समाजाच्या व इतर सर्व समाज्याच्या भावना दुखावण्याचा विखेंनी प्रयत्न केला असुन त्यांना पालकमंत्री पदावरुन पायउतार करावे ते पालकमंत्री म्हणून मिरवण्याच्या लायकीचे नाहीत भविष्यात विखे पाटलांनसारखा पालकमंत्री सरकारच्या मुळावर उठू शकतो म्हणून त्यांना वेळेत त्यांची जागा दाखवून द्यावी अन्यथा पुढील काळात आमच्या आठरा पगड जातीचं मतदान सरकारला मिळणार नाही सदर घडलेल्या घटनेचा विद्रोही दलित महासंघाचे संस्थापक, अध्यक्ष- बच्चन साठे यांनी नाराजी सह तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा