Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

लाठीचार्जच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन

 सराटी येथे लाठीचार्जच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन

पोलीस व अधिकारी यांच्या निलंबनाची आंदोलन कर्त्यांची मागणी


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी 

एस. बी. तांबोळी,

मोबाईल -8378081147

                 - सरकारने मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे. तसेच उपोषणाला बसलेल्यांनवर अमानूष लाठीचार्ज करणाऱ्या पोलीसांवर कठोर कारवाई करावी अन्यथा यापुढे तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

   जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलिस लाठीमारानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. सराटी येथे इंदापूर - अकलूज रस्त्यावर सोमवारी (ता. 4) मराठा समाजाच्या वतीने एक तास रास्ता रोको करण्यात आले. यावेळी युवक अध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे, काकासाहेब जगदाळे, रोहीत जगदाळे, मोहन काटे, बाळासाहेब कोकाटे, सुहास कोकाटे, अनिल कोकाटे, ज्ञानदेव कोकाटे, भैय्यासाहेब कोकाटे आदिंसह शेकडो कार्यकर्ते उपस्थीत होते.

    आरक्षण आमच्या हक्काच, नाही कुनाच्या बापाच, जय भवानी जय शिवराय, लाठीचार्ज करणारे अधिकारी व पोलीस निलंबीत करा नाही तर खुर्च्या खाली करा, समाजाचा अंत नका पाहु नका अशा प्रकारच्या घोषणांनी परीसर दणाणून सोडण्यात आला. तसेच अनेक कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारी दिरंगाई होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

   दरम्यान मराठा समाजाच्या वतीने मागितले जाणारे आरक्षण कोणावरही अन्याय करणारे नसून त्यांच्या न्याय हक्काचे आहे, कोणाचेही आरक्षण डावलून आम्ही आरक्षण मागत नाही तर आम्ही आमच्या हक्काचेच आरक्षण मागत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

     आज सोमवारचा अकलूज बाजार असल्याने तसेच अकलूजला जाण्यासाठी एकमेव सराटीचा पुल व रस्ता असल्याने दुतर्फा वाहनांच्या मोठ मोठ्या रांगा लागल्या होत्या. एक तासाच्या रास्तारोकोनंतर प्रशासनाला मागण्यांचा निवेदन देवून आंदोलन संपवण्यात आले.

     प्रशासनाच्या वतीने बावडा दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, मंडलाधिकारी एम. ढाणे, तलाटी राजाभाऊ पिसाळ निवेदन स्विकारण्यासाठी उपस्थित होते. आंदोलन कर्त्यांच्या भावना शासनाला कळविण्यात येतील असे सांगितले.


फोटो - सराटी येथे जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ रास्तारोको करण्यात आला. तसेच प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

---------------------------



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा