गणेशवाडी येथे बावडा नरसिंहपूर रस्त्यावर रास्ता रोको
इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मोबाईल -8378081147
- सरकारने मराठा समाजाला विनाविलंब आरक्षण द्यावे. तसेच उपोषण कर्त्यांवर अमानूष लाठीचार्ज करणाऱ्या पोलीसांवर कठोर कारवाई करावी. यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तसेच याला पाठिंबा म्हणून गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानूष पोलिस लाठीमारानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. गणेशवाडी येथे बावडा - नरसिंहपूर रस्त्यावर सोमवारी (ता. 4) मराठा समाजाच्या वतीने एक तास रास्ता रोको करण्यात आले. यावेळी बाळासाहेब घोगरे, दत्तात्रय घोगरे, मयुर घोगरे, गणेश घोगरे, फणिंद्र कांबळे, अक्षय घोगरे, जयदीप घोगरे, आकाश घोगरे, लखन तावरे आदिंसह कार्यकर्ते उपस्थीत होते.
आरक्षण आमच्या हक्काच, नाही कुनाच्या बापाच, जय भवानी जय शिवराय, लाठीचार्ज करणारे अधिकारी व पोलीस निलंबीत करा नाही तर खुर्च्या खाली करा, समाजाचा अंत नका पाहु नका अशा प्रकारच्या घोषणांनी परीसर दणाणून सोडण्यात आला.
दरम्यान मराठा समाजाच्या वतीने मागितले जाणारे आरक्षण कोणावरही अन्याय करणारे नसून त्यांच्या न्याय हक्काचे आहे, कोणाचेही आरक्षण डावलून आम्ही आरक्षण मागत नाही तर आम्ही आमच्या हक्काचेच आरक्षण मागत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
प्रशासनाच्या वतीने बावडा दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव निवेदन स्विकारण्यासाठी उपस्थित होते. आंदोलन कर्त्यांच्या भावना शासनाला कळविण्यात येतील असे सांगितले. तसेच टायर विझवून वाहतूक पुर्ववत करण्यात आली. गावातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून पाठींबा दिला.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा