Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

पावसाच्या हजेरीने शेतकरी नागरीकांत समाधान

 पावसाच्या हजेरीने शेतकरी नागरीकांत समाधान


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी

 एस. बी. तांबोळी,

मोबाईल -8378081147

           -नैऋत्य मौसमी पावसाने प्रदीर्घ चार महिन्याच्या प्रतिक्षेनंतर सलग दोन दिवस हजेरी लावल्याने शेतकरी व नागरिक समाधान व्यक्त केले जात आहे. पावसाअभावी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पावसाच्या आगमनाने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

     पावसाळ्याच्या चार महिन्यातील सर्वच नक्षत्रे कोरडी गेल्यामुळे शेती संलग्न सर्वच कामे ठप्प झाली होती. खरीपातील पेरण्या व ऊस लागवडी खोळंबून राहिल्या होत्या. तर बी बियाणे, रासायनिक खते, वाहन व्यवसाय, व्यापारी पेठ आदिंवर मोठा परिणाम झाला होता. परंतू पावसाने सलग दोन दिवस समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकरी, नागरीक, व्यवसायीक, शेतमजूर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

      सध्याला निरा व भीमा नद्यातील पाणी आटले असून विहिरी व बोअरला पाणी कमी होऊ लागले आहे. त्यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी जळून जाणार असल्याने शेतकऱ्यापुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यातच उजनी धरण परिसरात पाऊस नसल्याने 16 टक्के पाणीसाठा झाला आहे. भविष्यात उजनीतून पाणी सोडणे कठीण असल्यामुळे शेती पिकवायची कशी याची विवांचना लागून राहिली आहे.

     पावसाच्या दोन दिवसाच्या हजेरीमुळे काहीजणांनी ऊस व केळीच्या केलेल्या लागणीला दिलासा मिळाला आहे. तर तुटून जाणाऱ्या उसाला पाण्याची प्रतीक्षा होती ती या पावसाने काही प्रमाणात पूर्ण झाल्याने साधारणता बारा ते पंधरा दिवस पाणी देण्याची गरज भासणार नाही असे काही शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले. तर या पावसाच्या आधारावर संभाव्य उसाच्या लागवडी करता येतील असेही सांगण्यात आले. परंतु पावसाने चार महिन्याचा बॅकलॉग भरून काढावा अन्यथा पुढील पावसाळ्यापर्यंत पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

फोटो - गणेशवाडी येथे आभाळात ढग दाटून येऊन पावसाला सुरुवात झाल्याचे दिसत आहे.

---------------------------



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा