पुसेसावळी जि.सातारा येथील पिडीत कुटुंबाचे जीवन बनलेअंःधकारमय----शासनाने अद्याप सांत्वन केले नाही हे दुर्दैवी.
टाइम्स 45 न्युज मराठी नेटवर्क
पुसेसावळी जि.सातारा येथे 10 सप्टें. 2023 रोजी काही जातीयवादी समाजकंटकांनी मशिदीमध्ये आत जावून तेथील रहिवासी नुरुल हसन यांना जबर मारहाण केली, यामध्ये ते मृत्युमुखी पडले, ते सिव्हिल इंजिनिअर होते, घटनेवेळी ते मशीद मध्ये नमाज पठण करण्यासाठी गेले होते, त्यांच्यासोबत आणखी काही लोक तिथे होते, दंगा चालू झाल्यानंतर मशिदीचे दार त्यांनी आतून बंद केले, पण हल्लेखोरांनी मशिदीचे दार तोडून आत घुसून नमाज पठण करणाऱ्यांना मारहाण केली, त्यात आमचे मित्र नुरूल हसन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्यांची पत्नी सध्या सात महिन्यांची गर्भवती आहे, काय उत्तर देणार ती माता आणि हा समाज, ज्यावेळी त्यांचे होणारे अपत्य हे विचारेल की, "काय दोष होता माझ्या वडिलांचा, की त्यांना जिवानिशी मारले गेले ? असा कोणता गुन्हा त्यांनी केला होता ? मुस्लिम म्हणून जन्माला येणे हा त्यांचा गुन्हा होता का ?"
मॉब लिंचींग सारख्या घटना आता महाराष्ट्रात देखील होत आहेत पण ही प्रकरणे बाहेर येत नाहीत,
प्रसारमाध्यमे याला प्रसिध्दी देत नाहीत, मुस्लिमांच्या द्वेषापोटी अजून किती मोहसीन शेख, नूरुल हसन शिकलगार यांना आपला जीव गमावावा लागणार आहे, माहीत नाही. यात फक्त एक जीव जात नाही तर त्यांच्यावर विसंबून असलेले संपूर्ण कुटुंबिय होरपळते, समाजातील जातीय आणि धार्मिक सलोखा संपत चालला आहे, पण त्याचा विचार करते कोण ?
इंस्टाग्रामवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या बाबत चुकीची पोस्ट व्हायरल करणारा खरा गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले त्या तरुणाच्या द्वेष भावने मुळे निष्पाप नुरुल हासन चा बळी गेला आणि त्याचे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्या परिवारा मध्ये नुरुल हासन हाच एकटा कमावता एकुलता एक मुलगा होता त्या कुटुंबाचे जीवन अंःधकारमय झाले असुन शासनाने अद्याप मदत तर जाहीर केली नाही शिवाय त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी भेट सुध्दा दिली नाही हे दुर्दैव आहे.
नफरत छोडो, प्यार बाटो, देशवासीयों
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा