आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा एकूण 180 देशात 161 वा नंबर ---- ही देशासाठी लाजिरवाणी बाब
अशफाक शेख --वरिष्ठ पञकार
समय --औरंगाबाद
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
कुत्र्यांसारखं भुंकणाऱ्यांना "इंडिया"ची चपराक...!!आता म्हणे "मेडिया पर हमला"..!! विद्वेषाचा प्रसार करतांना या भोकूंना लाज वाटत नाही का?
तुम्हाला माहित आहे का 2014 ते 2022 या नऊ वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा कितवा नंबर गेला? *नाही ना? एकूण 180 देशात भारताचा नंबर 161व्या क्रमांकावर गेला आहे.गेल्या दहा वर्षांत भारताच्या मीडिया मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान खाली घालावी लागत आहे.नुकत्याच जी-20 नंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती जो बाईडन यांना भारतात पत्रकार परिषद घेण्यास मज्जाव करण्यात आलं....तेव्हा अमेरिकेला परततांना त्यांनी व्हिएतनाम येथे थांबून पत्र परिषद घेतली.त्यात त्यांनी "मी मोदींना प्रसार माध्यमाचे स्वातंत्र्य,मानवीय हक्क,सामाजिक सदभावना जपा" म्हणून सांगून आलोय...म्हटलं..!! 2002 साल पासून मोदी गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान आहे.या दोन्ही पदावर असतांना गेल्या तेवीस वर्षात त्यांनी एकही पत्रपरिषद घेतली नाही.2014 साली एका ट्विट मुळे इंडिटीव्ही वर भाजपने तीन महिन्याचे बहिष्कार टाकलं होतं.गुजरात निवडणुकीत आप पक्षाच्या प्रवक्त्यांना शो मध्ये बोलवाल तर चॅनेल वर बायकॉट ची धमकी देण्यात आली होती.कोरोना काळात भाजपच्या खासदार गटा तर्फे प्रकाश जावडेकर यांनी एकतर्फी लिखाण करणाऱ्या पत्रकारांना "NEUTRALIZE" म्हणजेच तटस्थ,नियंत्रित करण्यासाठी सरकारला सल्ला दिला होता.गेल्या पंचाहत्तर वर्षात जेव्हा-जेव्हा भारतीय पंतप्रधान विदेश दौऱ्यावर गेले त्यांनी चक्क आपल्या जहाजात पत्रकारांना घेऊन गेलेत.येतांना ते विमानातच पत्रकार परिषद घ्यायचं....ही परंपरा मोदींनी मोडीत काढली.आता थोडं थांबून विचार करा...!!
भारतात नुकताच "इंडिया" नावाची महाघाडी बनली.यांच्या तर्फे देशात विद्वेष फैलावणाऱ्या 14 पत्रकार-अँकर नव्हे "चाटु" चा बायकॉट करण्याचा निर्णय घेतला.14 अँकर वर बहिष्काराची घोषणा करताच हे चाटु चवताळलेत.म्हणे ये "मीडिया पर हमला है",तो गुलाम अर्णब सांगतोय....देश मे "इंडिया का पत्रकरो पर आपतकाल",सर्वत्र बोंबला-बोंबली सुरू झाली.मीडिया पर हमला बोलणाऱ्यांना लाज वाटायला हवी की गेल्या पंचाहत्तर वर्षाच्या भारतीय स्वातंत्र्य इतिहासात आज 28 मोठ्या पक्षांनी त्यांचा बहिष्कार केला.ही त्या पत्रकार साठीच नव्हे सर्व भारतीय पत्रकारिता जगाला शरमेची,आत्मचिंतन करणारी ही कृती आहे तुम्ही देशाला कटुता,विद्वेष,सामाजिक फाळणी ,जहाल विचारांच्या आगीत ढकलण्यास जबाबदार आहात.तो सुदर्शनवाला "यूपीएससी जिहाद" नावाचा कार्यक्रम करतोय,अर्णब,सुधीर चौधरी ते पपा की परी चित्रा त्रिपाठी,रुबिका लियाकत,अमन चोपडा,अमिश देवगण......यांनी "नफरत का बाजार"मांडलाय.चोवीस तास आपल्या कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम करत सर्व मर्यादा ओलांडल्यात.मुस्लिमांना कोरोना साठी "कोरोना जिहाद" म्हणतायत,नुह दंगलीच्या वेळेस अमन चोपडा "पर्मनंट इलाज"ची भाषा करतोय..."दिल्ली के अमन के दुश्मन कौन?" धर्म संसद...हनुमान जयंतीच्या निमित्ताने विशिष्ठ समाजाला कोण भडकवत होते?तुम्हीच ना?
चौदा चाटु वर बहिष्कार टाकताच हे बोंबलत आहेत.एडिटर्स गिल्ड ने यांच्या बद्दल काय भाष्य केलं होते? "Pro Modi Indian News Organisation are behaving like Radio Rawanda".रेडिओ रवंडा म्हणजे त्या देशात 1994 साली फक्त शंभर दिवसात आठ लाख तुतसी जातीच्या लोकांचा नरसंहार करण्यात आलं होतं.रेडिओ रावंडा मधून तुतसिंना कोक्रोच संबोधून त्यांचा समूळ कतलेआम करण्याचे फर्मान जारी करण्यात आले.चक्क भडकवणारे गाणी तयार करून रेडिओ वरून प्रसारित करण्यात आली.आता या नारसंहाराचा मास्टरमाईंड जेलोशा कबुजा कैदेत सडतोय.भारतात काय सुरू आहेत?जरा सावधान रहा."पर्मनंट इलाज" कार्यक्रम करणाऱ्या चाटुला माहीत असेलच हे वाक्य हिटलरने जर्मनीत ज्यूंचा नरसंहार करण्यास घोषणा म्ह्णून वापरलं होतं.
आता शेवटचं..... पंतप्रधान मोदी यांनी गेल्या एकवीस वर्षात एक ही प्रेस मीट न करता अघोषित बहिष्कारच टाकला.तरी त्यावर प्रश्न विचारत नाही.माजी मंत्री विके सिंग यांनी तर पत्रकारांना "prostitute"( वेश्या) म्हणून शब्द वापरलं.त्यावर बोंबलत नाही.तुमच्या पैकी तो केरळच्या सिद्दीक कप्पनला पाच हजारच्या केस मध्ये दोन वर्षे जेल मध्ये ठेवले,व्यापम घोटाळ्याची पोलखोल करणाऱ्या आज तक च्या अक्षय सिंगचा निर्घृण खून करण्यात आलं,केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना महिला पहिलवानच्या आंदोलना बद्दल प्रश्न विचारले म्हणून भास्करच्या दोन पत्रकारांना डिच्चू देण्यास भाग पाडण्यात आले.असली किती तरी उदाहरणं आहेत....त्यावर हे चाटु चवताळलेत नाही...!!खरंच यांच्या गुलामगिरीला सलाम...!कुत्र्या पेक्षाही जास्त निष्ठा बाळगणारी ही जमातच म्हणावं की नाही एखाद्या सभ्य समाजाला कलंकित करणाऱ्या असल्या भोकुंचा एक दिवस जनताच हिशोब काढल्या शिवाय राहणार नाही.लक्षात ठेवा...!!(जयहिंद)
अशफाक शेख,--वरिष्ठ पत्रकार,समय औरंगाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा