कोल्हापूर---- प्रतिनिधी
प्रा. विश्वनाथ---- पाटील
टाइम्स 45 न्यूज मराठी.
कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) / : तारीख : 16 : " शिक्षकांना अध्यापनात दररोज वेगवेगळ्या समस्या येत असतात. आपले विद्यार्थी चांगले घडविण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने कृतिसंशोधन करण्याची गरज आहे" , असे प्रतिपादन येथील ज्येष्ठ लेखिका प्रा. सुमन जोसेफ गायकवाड यांनी केले. येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कृतिसंशोधन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील म्हणाले की, शिक्षकांनी प्रामाणिकपणे कृतिसंशोधन केले तरच खऱ्या अर्थाने समस्यांवर उपाय करता येतील., अन्यथा कागदावरील संशोधनाचा काहीच उपयोग होणार नाही. दुसर्याच्या संशोधनाची कॉपी करता कामा नये. यावेळी प्रा. संजय गणपती जाधव यांनीही कृतिसंशोधन विषयावर मार्गदर्शन केले.
समृद्धी जाधव यांनी लेखिका श्रीमती सुमन गायकवाड यांचा परिचय करून दिला. राधिका निकम यांनी आभारप्रदर्शन केले. पल्लवी पवार यांनी सूत्रसंचालन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा