इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मोबाईल -8378081147
- ऐन पावसाळ्यात भिमा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे भिमा नदी काठावरील पाणीपुरवठा करणाऱ्या योजना बंद पडल्या आहेत. तर सोलापूर, सांगोला व पंढरपूरला पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भिमा नदीत सोमवार १८ सप्टेंबर पासून पाणी सोडण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी घेतला आहे.
पावसाळ्यातील जवळपास साडेचार महिने उलटून अद्यापही पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे नदी काठावरील इंदापूर, माढा, पंढरपूर, सांगोला तालुक्यातील पाणीपुरवठा योजना काही ठिकाणच्या बंद पडल्या तर काही ठिकाणच्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच शेतातील उभी पिके व चारा पिकांची टंचाई निर्माण झाली आहे. भिमा नदीवरील बंधारे पाण्याने भरून घ्यावीत अशी मागणी शेतकरी, नागरिकांनी केली आहे.
दरम्यान सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले, पाणी सोडण्यासंदभांत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी पाण्याची सद्यस्थिती जाणून घेतली आहे. त्यामुळे १८ सप्टेंबरला उजनीतून पाणी सोडल्यास २८ सप्टेंबरला औज बंधाऱ्यात पोहोचणार आहे. तर पंढरपूर, सांगोला आणि सोलापूर शहरासाठी एकूण चार टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. यातील दीड टीएमसी पाणी सांगोला अन् पंढरपूरला सोडण्यात येणार आहे.
उजनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरत असून चार टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतला आहे. त्यानूसार सोमवार १८ सप्टेंबरला पाणी सोडण्यात येणार आहे. सदरचे पाणी २८ सप्टेंबर पर्यंत औज बंधाऱ्यात अडीच टिएमसी पाणी पोहचणार आहे. तसेच सांगोला अन् पंढरपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या शिरभावी पाणीपुरवठा प्रकल्पात दिड टिएमसी पाणी सोडले जाणार आहे.
चौकट - उजनी धरणात सध्याला २५ टक्के पाणी साठा झाला आहे. परंतु पावसाची आता शक्यता मावळली असल्याने धरणाच्या पाण्यात वाढ होणे अवघड आहे. त्यामुळे धरणातील पाणी प्राधान्याने पिण्यासाठी ठेवावे लागणार आहे. शेतीला पाणी मिळणार नसल्याने पिकांची मोठी अडचण होणार आहे.
फोटो - गणेशवाडी येथे पाण्याअभावी भिमा नदीचे पात्र कोरडे पडले आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा