अकलूज शहर भाजपा च्या वतीने 100 महिला व 20 मार्गदर्शकांना तिरुपतीची "मोफत "तीर्थ याञा
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
अकलुज शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने 100 महिला भाविकांना मोफत तीर्थयाञेचे आयोजन केले असुन आज दि.11 सप्टेंबर 2033 रोजी 20 मार्गदर्शकासह 120 जण तिरुपती कडे रवाना झाले आहेत
या तीर्थयाञेचा प्रारंभ
माळशिरस तालुक्याचे लाडके आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते पुजा करुन व
नारळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी
अकलूज गावचे जेष्ठ नेते व माजी सरपंच .किशोरसिंह माने पाटील, भाजपा किसान मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्ष .बाळासाहेब सरगर, भाजप अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.मुख्तार भाई कोरबू,भाजप ओ.बी.सी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष .बाळासाहेब वावरे,भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपन काका नारनवर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिन शिंदे,
भाजपा अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे,भाजपा युवा मोर्चा डॉ.अक्षय वाईकर,भाजप अकलूज चिटणीस शेखर माने.भाजप माळशिरस उपाध्यक्ष बलभीम दादा जाधव,सुयोग खंडागळे,मनोज साळुंखे,भैय्या चंदनशिवे,सुहास गायकवाड, गायकवाड,सागर थोरात,अण्णा होनमाने ,सागर राजमाने,योगेश मिसाळ, चंद्रकांत धुमाळ व इतर मित्रपरिवार उपस्थित होते
या तीर्थयाञेचे आयोजन व नियोजन भारतीय जनता पार्टी अकलुज शहराध्यक्ष महादेवराव कावळे यांच्या वतीने करण्यात आले असून या तीर्थयात्रेस जाणाऱ्या महिलांना अकलूज ते मिरज लक्झरी बस ने घेऊन जाण्यात आले त्यानंतर मिरज येथून थेट तिरुपती ला जाणाऱ्या रेल्वेचे 120 जणांचे रेल्वे आरक्षण बुकिंग करून पाठवण्यात आले परतीच्या प्रवासात हे भाविक शुक्रवारी परत रेल्वेने कुर्डूवाडी जि. सोलापूर येथे आल्यानंतर अकलूज कडे बस ने घेऊन येणार आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा