सोलापूर जिल्ह्यातील "जनावरांचा बाजार "चालू करावा सोलापूर जिल्हा भाजपा युवा मोर्चा ची मागणी.
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
महाराष्ट्रामध्ये विशेषत: सोलापूर जिल्ह्यामध्ये पाळीव जनावरे जसे की, म्हैस, जरशी गाई या सारख्या जनावरांना "लम्पी "या आजाराने वेढले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली आहेत. हा आजार आटोक्यात यावा यासाठी प्रशासना मार्फत लसीकरण राबविण्यात आले होते. लसीकरणाच्या माध्यमातून जनावारांचा आजार पूर्णपणे बरा झाल्याचे निदर्शनास आले आहे. तरी देखील हा आजार पुन्हा उदभावत असल्याचे लक्षात येता सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनावर बाजार बंद करण्याचे आदेश काढले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील जनावरांच्या आठवडी बाजारात शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे जरशी गाई, म्हैस या जनावरांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. परंतु या आजारामुळे व्यापारी ,शेतकरी यांच्यावर बाजार बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे व त्यांच्याकडे उपलब्ध असलेले खरेदी विक्रीचे जनावरे जागेवरच आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना जनावरे संभाळणे कठिण झाले आहे.
तरी लम्पी आजाराचे लसीकरण मोठ्या प्रमाणात करून सोलापूर जिल्ह्यातील आठवड्यातील जनावरे बाजार नियम व अटी घालून चालू करण्याची मागणी सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. रणजित भोसले यांनी अकलूज" उपविभागीय अधिकारी "अकलूज यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा