Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

पावसाच्या हजेरीने शेतकरी नागरीकांत समाधानाचे वातावरण


 

इंदापूर प्रतिनिधी.....प्रतिनिधी

एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147


                             -गणेशोत्सव व गौराईच्या पार्श्वभूमीवर परीसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी व नागरीकांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. मागील साडेचार महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतीचे कामे ठप्प झाली आहेत.

    मौसमी पावसाच्या हंगामातील साडेचार महिन्यांतील जवळपास सर्वच नक्षत्रे कोरडी गेल्यामुळे शेतीशी संलग्न सर्वच कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडला आहे.

    काल संध्याकाळी सात वाजल्यापासून अचानक पावसाने सुरूवात करून रात्री उशिरापर्यंत हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शेतीला म्हणावा तसा पाऊस मागील चार महिन्यांत झाला नव्हता त्यामुळे शेतीची धुप भागली नव्हती. परंतू कालच्या पावसाने शेतीची धुप भागून शेतीत पाणी साचले होते.

    नगदी पिक असणाऱ्या ऊसाला पावसाने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे काही अंशी खुंटलेली वाढ होण्यास मदत होणार आहे. तर थोड्याशा प्रमाणात का असेना चारा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वाढली आहे. शेतकरी व नागरीकांनी अद्यापी पावसाची आशा सोडली नसून पावसाकडे आशाळभूत नजरेने पाहिले जात आहे.

फोटो - गणेशवाडी येथील शेतकरी मच्छिंद्र शिंदे यांच्या शेतात पावसाचे साचलेले पाणी दिसत आहे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा