Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

गौराईचे आगमन उत्साहात, आज पुजन,जेवण तर उद्या विसर्जन होणार


 

इंदापूर तालुका.....‌. प्रतिनिधी एस.बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

                            हिंदु संस्कृती प्रमाणे "श्री गणरायाचे" आगमनानंतर मानाच्या "गौराईचे" आगमन उत्साहात करण्यात आले. आज पुजा व हळदी कुंकूचा कार्यक्रम महिलांनी उत्साहात साजरा केला. तर उद्या विसर्जनानिमीत्त दोरे घेऊन निरोप देण्यात येतो. आज दिवसभर महिलांनी गौराईला भेटी देवून हळदी कुंकू लावून पुजा केली.



    अकलूज बाजार पेठेत "गौराई" च्या उभारणीसाठी लागणाऱ्या छत, खेळणी, मिठाई, फुले, फळे खरेदीच्या लगबगीने महिलांनी बाजार पेठ फुलून गेली होती. त्यानंतर छताची उभारणी करून त्याची फुलांचे हार, रंगीबेरंगी साड्यांनी सजवण्यात आले. तर गौराईच्या समोर खेळणी, मिठाई आकर्षक पध्दतीने ठेवण्यात आली. बाजार पेठेतील व्यापाराच्या चेहऱ्यावर दुष्काळ सदृश्य परस्थितीतही काही अंशी आनंद दिसून आला.

    "गौरी गणपतीच्या" सजावटी लागणाऱ्या फराळाचे साहित्य बनवण्यासाठी लागणारे वस्तू महागल्याने महिलांनी तयार वस्तू खरेदीला प्राधान्य दिले. त्यातच दुष्काळ सदृश्य परिस्थितीने म्हणावा तसा उत्साह दिसून आला नाही.

फोटो - गणेशवाडी येथील प्रभाकर व नामदेव घोगरे यांच्या घरातील गौराईची आकर्षक केलेली सजावट दिसत आहे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा