संसदेचे विशेष सत्र झाल्यानंतर हे हल्ले अधिक तीव्र होतील
--विजय घोरपडे.
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
ऑर्गनाइज्ड क्राइम ॲन्ड कॅरप्शन रिपोर्टींग प्रॉजेक्ट (OCCRP ) या आंतरराष्ट्रीय संस्थेचा अडानी - कांडाविषयी काल परवा "दी गार्डियन " आणि " फायनान्शियल टाईम्स " या देनिकांनी जो खळबळजनक रिपोर्ट प्रसिद्ध केला त्याची चर्चा आपण कालच्या लेखात केली . आज त्याच्या दुसर्या बाजूचा विचार करू !
OCCRP चा हा ताजा रिपोर्ट म्हणजे नवे काही नाही . हिंडनबर्गसारखाच तो रिपोर्ट असून या संस्थेने तो प्रसिध्द करून भारतावर , भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेवर हल्ला केला आहे , असा एक सोयीचा प्रचार अडानी ,संघ , भाजपा समर्थक करत सुटले आहेत. 24 जानेवारी 2023 रोजी
हिंडनबर्ग चा रिपोर्ट प्रसिध्द झाला होता तेंव्हाही हे लोक असाच प्रचार करत होते . अडानी ग्रुपने तर तेंव्हा पार्श्वभूमीला भारताचा तिरंगा लावून एक खास प्रेस कॉन्फरन्स केली होती ! आणि हा भारतावर हल्ला असल्याचेच सांगितले होते . मिडीयानेही विविध चर्चा सत्र आयोजित करून " भारतावर हल्ला " असाच सूर लावला होता .मात्र आज अडानीच्या शेअर मार्केट घोटाळ्याचा तपशील नामनिर्देशासह व पुराव्यासह या रिपोर्टमध्ये मांडून तो आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिध्द झाला तशी या सर्वांची हवा टाईट झाली . भारतीय मिडीयानेही या वेळी मौन बाळगले आहे . हिंडनबर्गचा रिपोर्ट हा इतका तपशीलवार नव्हता . तसेच हा आंतरराष्ट्रीय फ्रॉड अडानी ग्रुपने कशा प्रकारे केला हे त्या रिपोर्टमध्ये केवळ संकेत होते .आणि या नव्या रिपोर्टमध्ये थेट तपशील , नावे , रकमा आदी सर्वच दिले आहे . त्यामुळे हा रिपोर्ट म्हणजे भारतावर हल्ला नसून अडानी कंपनीने जागतिक पातळीवर केलेला फार मोठा आर्थिक घोटाळ्याची उकल करून OCCRP ने अडानी यांच्यावर हल्ला केलेला आहे . आणि अडानी व मोदी यांचे नाते आज भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे . त्यामुळे तो हल्ला मोदी यांच्यावरही आहे . पण तसे म्हणता येत नाही . म्हणून भारतावर हल्ला असा प्रचार होत आहे .म्हणून तर मोदीजी गेले 8 महिने त्यावर मौन धारण करून आहेत . भाजपा त्यांना वाघ , सिंह, 56 इंच छातीचे सांगतात . नव्याने त्यांना ' टर्मिनेटर ' ही म्हटले गेले आहे.. स्वतः मोदीजी स्वतःची छाती बडवून " एक अकेला सबपे भारी ' अशीही गर्जना करतात .पण देश जेंव्हा जेंव्हा संकटात असतो तेंव्हा ते लपून , मौन बाळगून असतात . कोरोना काळ , चीन घुसखोरी , महिला अत्याचार , मणिपूर , हरियाणा आदी हिंसा यावर बोलायला ही 56 इंची छाती कधी जनतेसमोर आली नाही !
वस्तुतः अडानी बंधूंच्या या आर्थिक स्कँडलचे स्वरूप आणि त्यात सहभागी असलेले परदेशी नागरिक यांचा विचार केला तर तेच भारतावर आर्थिक हल्ला करत होते असेच म्हटले पाहिजे . गौतम अडानी यांचे बंधु विनोद अडानी यांनी केवळ आपल्या व्यावसायिक स्वार्थासाठी भारताचे नागरिकत्व सोडून मॉरिशसचे नागरिकत्व स्वीकारले .कारण त्या देशात टॅक्स नाहीत . इथपर्यंत ठिक ! पण हे दोन्ही बंधु भारताचा महसूल आणि टॅक्स बुडवून भारताचा पैसा विदेशात पाठवत राहिले . तो तेथील वेगवेगळ्या शेल ( बोगस ) कंपन्यांमध्ये फिरवून पुन्हा भारतातच पाठवून अडानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर चढत्या भावाने खरेदी करून अडानी कंपन्यांचे व्हॅल्युएशन वाढवत होते . अडानीच्या काही कंपन्या डिफेन्सशी जोडलेल्या आहेत . आणि अशा संवेदनशील कंपन्यांमध्ये अरब अमिराती व चिनी नागरिकाची गुंतवणूक होते हा भारताच्या सुरक्षेवर हल्ला नाही काय ? आणि या परदेशी नागरिकांची ही 13 ते 15 टक्के गुंतवणूक अत्यंत गुप्तपणे होते याचा अर्थ काय ? राहूल गांधी आज ' ते 20 हजार कोटी कोणाचे ? ' असा जो प्रश्न करत आहेत ते उगाच नव्हे ! या मंडळींना आर्थिक स्वार्थापोटी देशाचेही हित राहिले नाही हेच यातून सिध्द होत नाही काय ?
दुसरे ! देशातील उद्योग , औद्योगिकीकरण यांना ठप्प करून केवळ निवडक कार्पोरेट कंपन्यांना सरकारचे करोडो रू.चे प्रॉजेक्ट देऊन त्यांनाच श्रीमंत करायचे हा भारतावर , भारताच्या अर्थकरणावर हल्ला नाही काय ? सर्वसामान्यांचे प्रश्न , देशाच्या समस्या मांडणारा मिडीयाच या कार्पोरेटस च्या नावाने विकत घेऊन त्याला सरकारी स्तुतीपाठक आणि केवळ " मोदी गान " करायला लावणे हा भारत देशावर , येथील सामान्य जनतेवर हल्ला नाही काय ? तेंव्हा मित्रांनो !
या OCCRP चा हा अत्यंत कष्टपूर्वक तयार केलेला रिपोर्ट हा भारतावर केलेला हल्ला नाही . तर आज अडानी सारख्या स्वार्थी कार्पोरेटस च्या मदतीने मोदी सरकार जनतेच्या मूलभूत हक्कांवर , सुखाच्या सामान्य जगण्यावर हल्ला करत आहे . त्याचे ताजे उदाहरण म्हणजे ' मराठा मोर्चावर झालेला हल्ला " .... आणि हे असे हल्ले संसदेचे विशेष सत्र झाल्यानंतर अधिक तीव्र होतील . कारण निवडणुका जिंकायच्या आहेत.
धन्यवाद !
● विजय घोरपडे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा