"पानवन " येथील महिला अमानुष मारहाण निषेधार्थ दलित महासंघाचा म्हसवड येथे निषेध मोर्चा
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामधील पानवन या गावामध्ये "शहिदा महादेव तुपे "या महिलेला गावातील जातीवादी गाव गुंडाकडून दिवसाढवळ्या अमानुष मारहाण करण्यात आली होती. सदर घटनेच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीने प्रा.डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्या नेतृत्वाखाली आज म्हसवड पोलीस कचेरीवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
महात्मा ज्योतिबा फुले चौकातील महात्मा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज, लहुजी वस्ताद, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, उमाजी नाईक या महापुरुषांच्या नावाचा जयजयकार करीत हा मोर्चा सुरू झाला. सदर मोर्चामध्ये शहिदा महादेव तुपे या पीडित महिलेच्या कुटुंबाचे पुनर्वसन व्हावे या प्रमुख मागणीसह गुंड प्रवृत्तीच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यात यावे , शहिदा महादेव तुपे हिच्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरी मिळावी.. अशा प्रकारच्या घोषणा देत मोर्चा अण्णा भाऊ साठे चौकामध्ये आला. यावेळी पंढरपूर - सातारा हायवे बंद करण्यात आला होता. मोर्चाच्या ठिकाणी भर उन्हात माण तालुक्याचे तहसीलदार योगिता ढोले उपस्थित होत्या. या निषेध मोर्चामध्ये पीडित महिला शहिदा महादेव तुपे व तिचे संपूर्ण कुटुंबीय सहभागी झाले होते.
सदर मोर्चामध्ये दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. पुष्पलता सकटे, राज्य उपाध्यक्ष शंकरराव महापुरे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ खिलारे, केरबा लांडगे तसेच बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बळीराम रणदिवे, नाथा खिलारे, पंच शहाजी लोखंडे, प्रमोद लोखंडे , विनायक तुपे, युवराज तुपे,भोजलिंग तुपे, विनायक लोखंडे, ह भ प माणिकराव महाराज, संजय चांदणे, धनाजी सकटे, मोहन माने आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे( पुणे ),लहुजी शक्ती परिषद (पुणे) अध्यक्ष अनिल हातागळे, भास्कर नेटके यांनीही मोर्चामध्ये सहभाग घेतला.
दलित महासंघाचा हा म्हसवड मधील निषेध मोर्चा आणि त्यातील घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. अत्यंत जहाल अशा घोषणा हा म्हसवड मध्ये चर्चेचा विषय झाला होता. यावेळी म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस प्रमुख राजकुमार भुजबळ हे स्वतः मोर्चामध्ये उपस्थित होते. मोर्चाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा