पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या- माळशिरस तालुका अध्यक्षपदी- हेमंत कांबळे , युवक तालुका अध्यक्षपदी- सचिन मोरे , तर अकलूज शहर अध्यक्षपदी --शिवाजी खडतरे यांची निवड.
संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स - 45 -न्युज मराठी
मो.9730 867 448
राष्ट्रीय अध्यक्ष लॉंगमार्च प्रणेते माजी खासदार जोगेंद्रजी कवाडे सर,राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी हेमंत कांबळे युवक तालुका अध्यक्षपदी सचिन मोरे तर अकलूज शहराध्यक्षपदी शिवाजी खडतरे यांची निवड महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी जाहीर करून निवडीचे पत्र दिले.
रविवार २४ सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह अकलूज येथे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या अध्यक्षतेखाली माळशिरस तालुका व अकलूज शहर कार्यकारिणीच्या निवडीची बैठक पार पडली.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांना प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन निवडीच्या मिटींगला सुरुवात करण्यात आली यावेळी या बैठकीला संबोधित करताना युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार जोगेंद्र कवाडे सर,राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील योगदानाची माहिती देऊन नूतन पदाधिकाऱ्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीची ताकद वाढवून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवावेत असे आवाहन यावेळी केले.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी हेमंत कांबळे,तालुका कार्याध्यक्षपदी संतोष गायकवाड,युवक तालुका अध्यक्षपदी सचिन मोरे,तालुका संघटकपदी पांडुरंग चव्हाण,तालुका सरचिटणीसपदी दयानंद कांबळे, तालुका खजिनदारपदी विश्वास उघाडे,तालुका संपर्क प्रमुखपदी राजू बागवान,तालुका सहसंपर्क प्रमुखपदी रोहिदास तोरणे,अकलूज शहराध्यक्षपदी शिवाजी खडतरे,तालुका युवक कार्याध्यक्षपदी शिवम गायकवाड, तालुका युवक संघटकपदी कबीर मुलाणी,अकलूज शहर उपाध्यक्षपदी साजिद बागवान,शहर कार्याध्यक्षपदी शहाजी खडतरे,शहर सरचिटणीसपदी ऋतुराज थोरात, अकलूज शहर युवक अध्यक्षपदी अशोक कोळी यांच्या निवडी करून महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते सत्कार करून निवडीचे पत्र देण्यात आले निवडीला उत्तर देताना तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे यांनी माळशिरस तालुक्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीची ताकद वाढविणार असल्याचे सांगितले यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष निलेश खरात,पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन जाधव,माढा तालुकाध्यक्ष शशिकांत पांढरे,पंढरपूर तालुका संपर्कप्रमुख सावता नवगिरे,सुनील खांडेकर,महिला आघाडीच्या जयश्री गायकवाड,सया शिंदे,आदेश थोरात,अर्जुन कोळी,सचिन कोळी,अर्जुन जाधव,वैभव आंबुरे,मन्सूर काझी,बाबासाहेब ननवरे,ऋषिकेश गायकवाड,संदीप पवार,दिपक बाबर,आलिम शेख यांचेसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते निवडीचा कार्यक्रम झाल्यानंतर अकलूजमधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारतरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला सर्व नूतन पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा