भ्रष्टाचार करणाऱ्या" स्वस्त धान्य दुकानदारा "ची चौकशी करून त्यांचे परवाने रद्द करावे --- ॲड. रणजित भोसले.
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
भ्रष्टाचार करणाऱ्या रेशन दुकानावर करावाई करावी यासाठी आज तहसीलदार माळशिरस यांना निवेदन देण्यात आले,_
_माळशिरस तालुक्यातील अकलूज व परिसरामध्ये सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानावर वितरीत करणारे धान्य हे रेशनकार्डव्दारे वितरीत केले जात आहे,परंतू काही ठिकाणी रेशन कार्ड उपलब्ध असताना देखील त्यांच्या हक्काचे धान्य व माल लाभार्थ्यांना मिळत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे,रेशनकार्डवर मिळत असलेला माल हा या महिन्यात माल आलेला नाही किंवा तो संपलेला आहे असे रेशन दुकानदार ग्राहकांना सांगत आहेत व तोच माल काळ्याबाजारात जास्त पैशाने वितरीत केला जात आहे, परस्पर मिळत असलेल्या माला पैकी निम्मा माल ग्राहकाला देऊन त्यांचे मशिनवर थम घेऊन त्यांना पूर्ण माल दिला जात नसून तो माल काळ्या बाजारात विक्री केला जातो, तसेच ग्राहकांनी तक्रारनोंद वहीची मागणी केली असताना देखील स्वस्त धान्य दुकानामध्ये तक्रार नोंदवही आढळून येत नाही,_
दर महिन्याला शासनाचे संपूर्ण धान्य रेशनदुकानदाराला मिळत असताना देखील तो पूर्णपणे वितरीत केला जात नसून अशा दुकानांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, तसेच भ्रष्टाचार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांची चौकशी करून त्यांच्याकडील स्वस्त धान्य दुकान परवाना रद्द करण्याचे आदेश द्यावेत व आशा भ्रष्टाचार करणाऱ्या दुकानावर योग्य ती कारवाई व्हावी जर अशा दुकानावर योग्यती कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा_
भारतीय जनता युवा मोर्चाचे सोलापूर जिल्हा, उपाध्यक्ष_
. ॲड.रणजित भोसले_
यांनी माळशिरस चे तहसिलदार यांना निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा