Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

आंदोलन मोर्चे निषेध झाल्यावरच महाराष्ट्र शासन जागे होणार का ?

 मराठा आरक्षणावर राज्यात तीव्र आंदोलन मोर्चे निषेध झाल्यावरच महाराष्ट्र शासन जागे होणार का ?


श्रीपूर----- जेष्ठ पत्रकार

  बी.टी. शिवशरण

टाइम्स 45 न्युज मराठी

 मो.9579 177 671

           मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने काही त्रुटी दाखवल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत सुप्रीम कोर्टाने हा निर्णय देऊन अनेक महिने उलटले आहेत जर महाराष्ट्र शासनाला खरोखरच मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक इच्छा आहे तर मग सुप्रीम कोर्टाने दाखवलेल्या त्रुटी सुधारणा व त्यावर निश्चित उपाय करण्यात शासन अद्याप गप्प का बसले आहे मराठा समाजाने उग्र आंदोलन भव्य मोर्चे निदर्शने निषेध करण्याची शासन वाट पाहत बसले आहे का जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे उपोषण मोडुन काढण्यासाठी पोलिस बळाचा वापर करून आंदोलनं करणार्या तरुण मुले महिला यांचेवर अमानुषपणे लाठीचार्ज केला त्यांना जबरदस्त दुखापत झाली या सर्वांचा उद्रेक महाराष्ट्रात झाला राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला मराठा समाज आक्रमक झाला आहे त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत त्या दुरुस्ती बाबत महाराष्ट्र शासन आता पर्यंत गप्प बसले म्हणजे मराठा समाज रस्त्यावर उतरून त्यांनी तीव्र निषेध आंदोलन मोर्चा उपोषण जाळपोळ करण्याची शासन वाट पहाते काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा