श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण भूमिपूजन संदर्भात "स्मृतीभवन" येथे बैठकीचे आयोजन
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर या साखर कारखाना विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन समारंभ तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केलेले आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी सोमवार दि 4 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9/ 30 वा शंकरनगर येथील "सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील "स्मृतीभवन --येथे बैठकीचे आयोजन आमदार.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केलेले आहे. तरी माढा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते नेतेमंडळी, भाजपा कार्यकारणी, मोर्चा, सेल/आघाडीचे सर्व पदाधिकारी, शक्तीकेंद्र व बूथ प्रमुख, तसेच भाजपाच्या सर्व कार्यकर्ता बंधू-भगिनी यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा