Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

आश्वासनाचे भिजत घोंगडे

 महसूल मंत्री "राधाकृष्ण विखे पाटील" यांनी दिलेल्या आश्वासनाचे भिजत घोंगडे


श्रीपूर----- जेष्ठ पत्रकार

  बी.टी. शिवशरण
टाइम्स 45 न्युज मराठी
 मो.9579 177 671
            महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या वर्षी श्रीपूर येथे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात महाराष्ट्रातील शेती महामंडळ ऊस मळ्यातील सेवानिवृत्त कामगार व विद्यमान कामगार यांच्या रहाण्यासाठी महाराष्ट्र सरकार त्यांना ते रहात असलेली जागा नावावर करून देण्या संदर्भात जाहीर आश्वासन दिले होते तसेच सरकारने महाराष्ट्रात शेती महामंडळ ऊस मळ्यातील सेवानिवृत्त कामगार यांना कसण्यासाठी पाच एकर जमीन व रहाण्यासाठी दोन गुंठे जागा द्यावी यासाठी शेती महामंडळातील कामगार युनियन तसेच कामगार कृती लढा समिती यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे लेखी मागणी केली आहे पाठपुरावा केला आहे यापुर्वीही अनेक माजी महसूलमंत्री मुख्यमंत्री यांचे सोबत मंत्रालयात प्रतिनिधी यांच्या बैठका झाल्या आहेत पण ठोस निर्णय किंवा अंमलबजावणी केली जात नाही या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी श्रीपूरला पाच आमदार एक खासदार यांचे उपस्थितीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः हुन शेती महामंडळ ऊस मळ्यातील कामगार यांना रहाण्यासाठी शासनाच्या वतीने दोन गुंठे जमीन देण्याचे आश्वासन दिले होते मात्र मंत्रीमहोदय यांचेकडे महसूल खाते आहे मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव मागणी ठेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे कडून मागण्या बाबत मंजुरी आदेश घेणे त्यांच्या हातात आहे मात्र गेले दहा महिन्यांपासून त्यांनी केवळ दिलेल्या आश्वासनांचे व्यतिरिक्त काही पुढे झाले नाही राज शेती महामंडळ ऊस मळ्यातील हजारो सेवानिवृत्त कामगार शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणी कडे डोळे लावून बसले आहेत महसूल मंत्री यांनी येत्या दिवाळी पुर्वी तरी आपण दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा