Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

गणेशवाडी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

 गणेशवाडी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी 

एस. बी. तांबोळी,

 मोबाईल- 8378076123

                साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती परिसरातील गावात विविध उपक्रम राबवून, कार्यक्रम व त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून संपन्न झाली.

   गणेशवाडी येथे साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सिने कलाकार बाबा गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नामदेव घोगरे, सुधाकर कांबळे, फणिंद्र कांबळे, संतोष खंडागळे, शितल कांबळे, किरण खंडागळे, शरद गायकवाड, महेंद्र साठे, ज्ञानेश्वर साठे, अश्विनी साठे, सागर खंडागळे, आण्णा कांबळे, आकाश भंडारे, लालासाहेब रास्ते, मुजाहिद तांबोळी आदि मान्यवर उपस्थित होते.

  

  फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर, ट्राॅलीमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची पूर्णाकृती प्रतिमा ठेवण्यात आली होती. समाज बांधव व मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन करून गावातील मुख्य मार्गावरून त्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. समाजातील तरुण मंडळीने अण्णाभाऊ साठे यांच्या जय गोषाने परिसर दुमदुमून टाकला होता.

   

नरसिंहपूर, टणू, गिरवी, गोंधळी आदि गावातही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

फोटो - गणेशवाडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर दिसत आहेत.

---------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा