Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

वृध्दाश्रम"शाप कि वरदान"

 


लेखक ---अशोक पंडीत

निवृत्त ---मुख्याध्यापक

 श्रीपूर--जि.सोलापूर.

                          - 

ज्यांनी आयुष्यभर अनेक खस्ता खाऊन स्वतःची ओढाताण करून आपल्या मुलाबाळांना वाढवले त्यांना मोठे करून स्वतःच्या पायावर उभे केले अशा लोकांच्या अनेक मुलांनी अत्यंत हुशारीने वागून आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला असे समाजात दिसून येते आपल्या आसपास घडणाऱ्या काही घटना बघितल्या की अंगावर काटा येतो साधारणपणे साठी 65 नंतर मनुष्य मग तो पुरुष असो अथवा स्त्री इतक्या वर्षाच्या संघर्षाला कंटाळून थकलेला असतो मुले मोठी झालेली असतात त्यांचे संसार सुरू झालेले असतात अशा कातर वेळी त्यांना स्वतःसाठी निवांत वेळ हवा असतो विश्रांती हवे असते त्यांना मुलाप्रमाणेच सून आणि नातवंडांचे प्रेम हवे असते माया हवी असते भावनिक सुरक्षितता हवी असते व नेमके याचवेळी मुलां बरोबर सुनेबरोबर त्यांचे खटकते आणि त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला जातो खरंच वृद्धाश्रमांची गरज आहे का असेल तर ती कुणासाठी आपण मुलांवर संस्कार करण्यात कमी पडत चाललो आहोत का? आज समाजात वृद्धाश्रमांची संख्या का वाढत चालली आहे तिथे राहणाऱ्या वृद्धांना खरंच मनासारखे जीवन जगता येते का त्या वृद्धाश्रमांचे व्यापारीकरण होत चालले आहे का वृद्धाश्रमात जाऊन फादर्स डे मदर्स डे साजरे करण्याची आपल्यावर पाळी का येत आहे कायदे कानून याबाबत अधिक क** का होत नाहीत काही जण तर वृद्धाश्रमातील आई-वडिलांच्या मृत्यूप्रसंगी सुद्धा हजर राहू शकत नाही तिथल्या संस्थेलाच विल्हेवाट लावण्याची परवानगी देतात हे पाहून ऐकून मन उद्विग्न होते हीच का आपली संस्कृती हेच का आपले शिक्षण असे प्रश्न निर्माण होतात खरंतर आपली हिंदू संस्कृती जगात महान आहे त्यात महाराष्ट्राला सर्वात जास्त पुरोगामी समजले जाते मी महाराष्ट्रातील काही वृद्धाश्रम पाहिले आहेत त्यांचे कामकाज पाहिले आहेत तिथे वृद्धांच्या व्यथा जाणून घेतले आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावे असे मला वाटते मी वर्षातून दोन-तीन वेळा गोडधोड जेवण देतो त्यांच्या समावेत काही तास घालवतो त्यांची विचारपूस करतो काहींना आर्थिक मदत करतो काहींनी पुढील वेळेस येताना माझ्या खालील गोष्टी आणा असे सांगितले असते सांगितले असते त्या मी घेऊन जातो तेथील कर्मचाऱ्यांचे कौतुक करतो दिवाळीत त्यांना गिफ्ट देतो जड पावलांनी घरी परत पण मनात येते की ऊर्जा श्रमाची गरज आहे का ?


         - -

एका अहवालानुसार भारतात सुमारे 2000 वृद्धाश्रम आहेत त्याच सुमारे लाख ते दीड लाख वृद्ध राहतात महाराष्ट्रात 24 वृद्धाश्रम असून मातोश्री वृद्धाश्रम योजनेअंतर्गत विनाअनुदान तत्त्वावर चालवले जातात येथे राहणारे लोक गरीब गरजू निराधार असतात काहींना मुलांनी आणून सोडले असते तर काही श्रीमंतांसाठी खाजगी तत्वावर चालली जाणारी वृद्धाश्रम आहेत ते वेगळेच यात एक वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम समाजाची वृद्धाश्रम आढळून येत नाहीत कारण एका अहवालानुसार मुस्लिम समाज आई-वडिलांना सांभाळतात त्यांची देखभाल करतात कुराणामध्ये आल्यानंतर आई-वडिलांचे चरणी जन्नत आहे असे ते समजतात त्यांच्या या गुणाचे खरोखरच कौतुक करावे तेवढे थोडे आहे पण आमच्या समाजात आई-वडिलांना न सांभाळण्याची उप वृत्ती वाढत चालली आहे सरकारलाही वृद्धाश्रम काढावी लागत आहेत आपल्या आई वडील मुलांना जड व्हावे इतकीच होती समाजात वाढत आहे जे आपल्या आई-वडिलांची अजय सेवा करतात त्यांना मनापासून सांभाळतात अशा मुलांचे आणि सुनांचे मनापासून कौतुक करतो अलीकडे वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे माणसाचे वयोमान वाढत चालले आहे असे असले तरी माणसातील ओलावा जिव्हाळा आपुलकी प्रेम यातच चालले आहे त्यामुळे वृद्ध वृद्धांमध्ये जगताना अडचणी वाढत आहेत कधी उपासमारी तर कधी कुपोषण त्यांचे होते यासाठीच मुला मुलींना आपण जन्माला घातले का असे त्यांना वाटते कुठे तो श्रावण बाळ आणि कुठे ती आजची बाळे सरकारला श्रावणबाळ योजना आणावी लागते संजय गांधी निराधार योजना राबवावी लागते



      - - -

बरीच मुले म्हणतात आम्हाला बायकोचे ऐकावे लागते अरे पण तिला आई-वडील आहेत आणि एक ना एक दिवस तुम्हीही म्हातारे होणार आहात हे विसरू नका जरा अंतर्मुख व्हा आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या काय आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही मुलांचे केलेले अतिधाड हेही घातक ठरत आहेत त्यांच्या अनेक चुकाकडे आई-वडील दुर्लक्ष करतात त्यातून ते उनाड होत चाललेले आहेत काही वृद्ध म्हणतात याचा पायगुण आधीच कळला असता तर याचा लहानपणीच बाल सुधार ग्राहक भरती करून दिली असती म्हणजे म्हातारपणी पश्चातापाची वेळ आली नसती आपल्या मुलांना मोबाईल टीव्ही यापासून दूर ठेवून चांगले संस्कार द्या त्यांच्यासाठी वेळ द्या त्यांचे फाजील झाड करू नका प्रसंगी कठोर बना तरच वृद्धाश्रमे कमी होतील नाहीतर भयानक वास्तव आ पासून येत आहे हे लक्षात ठेवा


           - - - -

आता तर नवीनच वृद्धाश्रम घरात निघत आहेत आणि ती म्हणजे स्वतःच्या घरातच बंदिस्त वृद्धाश्रम म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या म्हाताऱ्यांच्या वर टाकून मुले सुना नोकरीच्या मागे धावत आहेत त्यांचा गैरफायदा घेत आहेत मुले म्हणतात तुम्हाला वृद्धाश्रम नको तर ठीक आहे तुम्हाला घरातच सर्व सुख सोयी देतो घरीच रहा म्हणजे आम्हालाही वाईटपणा नाही सोनेरी पिंजऱ्यात आई-वडिलांना कैद करून टाकले जाते व आपल्या हक्काचे बिन पगारी नोकर त्यांना बनवले जाते व स्वतः करिअरच्या मागे धावत असतात त्यात जिव्हाळा प्रेम आपुलकी नसतेच नातवंडांना वेळोवेळी जेवायला देणे अंघोळ करणे शाळेत नेणे आणणे आजारी असल्यास औषध पाणी देणे त्यांची काळजी घेणे त्यांना हवे नको ते पाहणे हे या वयात प्रत्येक वृद्धांना शक्य होईलच असे नाही पण काय करणार तोंड दाबून बुक्क्याचा मार होतो डे केअर मध्ये या मुलांना प्रेम मिळेलच असे नाही या विचाराने ते न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारतात आणि प्रसंगी आपली वामकुक्षी टाळून नातवंडांची काळजी घेतात एवढे करूनही जर कुठे चूक झाली तर त्यांना मुलाचे आणि सुनांचे खडे बोल ऐकावे लागतात बरोबर छान दिसणाऱ्या आयुष्याचे हे असले सोनेरी वृद्धाश्रम पाहायला मिळू लागले आहेत इथे सर्व सुखे हात जोडून उभे आहेत पण विश्रांती नाही जबाबदाऱ्या संपलेल्या नाहीत प्रसंगी स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता नातवंडांच्या मागे धावावे लागते मला असे वाटते तुमचे करिअर हे महत्त्वाचे असेल तर हृदयावर धोंडा ठेवा मुलांना दे केअर मध्ये पाठवा किंवा मुलांना जन्माला घालू नका मुलांचे करणे जमत नसेल तर मुले मोठी होईपर्यंत नोकरीचा राजीनामा द्या घरी बसा त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धावा पळा प्रयत्न करा वृद्धांची होत असलेली कोंडमारा हा असह्य असला तरी त्याची घनता आणि ही शब्दात व्यक्त करता येत नाही हा सर्वात मोठा त्यांना त्रास आहे


              - - - - - 

अलीकडे वृद्धाश्रमात धाडणे हे फॅशन प्लस चालले आहे किरकोळ अपवाद वगळता वृद्धाश्रमात सुद्धा सोयी सुविधा मिळतात ही आपलेपणाने त्यांचे केले पण जाते पण त्यात मुलांचे प्रेम जिव्हाळा आपुलकी वात्सज्य भावनिक सुरक्षा यांचे सर करता येणार नाही म्हणून तरुणांनो निष्ठूर बनू नका आई-वडिलांना अडगळ समजू नका त्यांना कॉपरेट टाकू नका त्यांना जपा शिवीगाळ करू नका प्रसंगी मारहाण करणे हे टाळा त्यांना आपले दैवत समजून त्यांची भावनिक पूजा करा त्यांचे आशीर्वाद भविष्यात तुमच्या अनेक समस्या सोडवतील मातृदेवो भव पितृ देवो भव ही आपली संस्कृती जपा म्हणजे वृद्धाश्रमे कमी होतील आणि वृद्धांनी सुद्धा आपला हट्टीपणा सोडून त्यांच्या संसारात ढवळाढवळ न करता त्यांना फक्त मार्गदर्शन करावे अशी भूमिका घेतली पाहिजे


लेखक ;--

अशोक पंडित -श्रीपूर

माजी-मुख्याध्यापक ;-

शिक्षण प्रसारक मंडळ ,अकलूज.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा