अंतरवाली सराटी येथील मराठी बांधवांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ अकलूज सह माळशिरस तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलन व बंद
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
अंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना येथील मराठा आरक्षणाबाबत "आमरण उपोषण "करणाऱ्या मराठा समाज बांधवांवर अमानुषपणे गोळीबार व लाठी हल्ला केल्याच्या निषेधार्थ निषेध व्यक्त करण्यासाठी 5 सप्टेंबर 2023 रोजी माळशिरस तालुक्यात- नातेपुते (दहिगाव चौक) माळशिरस (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक) पानीव पाटी चौक ,वेळापूर येथील (पालखी चौक )श्रीपुर येथील (शिवाजी महाराज पुतळा) लवंग येथे 25/4 चौक, साळमुख चौक, तसेच अकलूज मध्ये( महर्षी चौक) येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले
आणि मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला प्रतिसाद देत संपूर्ण अकलूज बंद ठेवण्यात आले तसेच व्यापाऱ्याने आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला
पोलीस लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अकलूज येथील महर्षी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले "एक मराठा लाख मराठा "-"तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय"-- "मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे" --"नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं" इत्यादी घोषणा देण्यात आल्या
याप्रसंगी विविध संघटना समाजातील प्रतिनिधींनी आपले मनोगत व भावना व्यक्त केल्या
या आंदोलनास- हजरत टिपू सुलतान यंग ब्रिगेड, "के जी एन ग्रुप " "मुस्लिम समन्वयक समिती " "महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना" " शिवछत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड" "वंदे मातरम गणेशोत्सव मंडळ" "वंचित बहुजन आघाडी" "पगडी चा राजा प्रतिष्ठान" 'अकलुज शहर मुस्लिम समाज अकलूज , "लिंगायत समाज शिव निर्णय संघटना" "अकलूज धनगर समाज संघटना "महाराष्ट्र वीरशैव संघटना" " माळशिरस तालुका लाड सुवर्णकार संघटना" "स्वाभिमानी शेतकरी संघटना" इत्यादी संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा देऊन सहभागी झाले होते
याप्रसंगी मराठा आरक्षणासंदर्भात सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील 'म्हणाले की मराठा आरक्षणासाठी विधानसभेतील सर्व आमदारांनी एकत्रित चर्चा करून तोडगा काढला पाहिजे मराठा आरक्षण दिलेला आहे मात्र ते हायकोर्टात टिकले पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण कायमस्वरूपी मिळण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असून ते तात्पुरती आरक्षणाचा काही उपयोगच नाही
चक्काजाम आंदोलनानंतर मराठा समाजाच्या वतीने अकलूजचे उपविभागीय अधिकारी -नामदेव टिळेकर व अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी- सई भोरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले
या आंदोलनास हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांसाठी इतर समाज बांधव उपस्थित होते
---------------------------*--------------------







.jpg)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा