*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारूळ तालुका तुळजापूर येथे आषाढी वारी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी , संत ज्ञानेश्वर महाराज,वारकरी यांच्या वेशभूषा करून आले होते. सकाळी शाळेतून दिंडी निघाली व संपूर्ण गावात समाज प्रबोधनपर घोषणा देत परत दिंडी शाळेमध्ये येऊन दिंडीची सांगता झाली. यावेळी पालक, विद्यार्थी, गावातील भजनी मंडळ यांनी फुगडी खेळली, भजने गायली, पारंपारिक लोकनृत्य सादर केली. आषाढी वारीच्या दिंडीतून वृक्ष लागवडीचे त्याचप्रमाणे साक्षरतेचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सौदागर शेख यांनी केले त्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासामध्ये गावातील भजनी मंडळाचा सहभाग कसा असतो हे पटवून दिले, शाळेच्या विद्यार्थी प्रवेश वाढीमध्ये भजनी मंडळाचे सहकार्य वारंवार असते हे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सौदागर शेख, पदवीधर शिक्षक बालाजी पवार , अमिन मुलाणी,शिक्षिका रूपाली गडेकर ,कल्पना चव्हाण, सरोजनी जाधव, शितल वाघमारे यांनी मेहनत घेतली. तसेच बारूळ गावातील भजनी मंडळातील उत्तरेश्वर ठोंबरे, दिलीप कोल्हे, बाळेश्वर ठोंबरे, विलास कोळी ,संजय वट्टे ,नैना वट्टे, लताबाई कोल्हे,भागीरथी वट्टे, भीमराज धनवडे, माणिक कोळी आदी भजनी मंडळ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा