Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

मुख्यमंत्री -"एकनाथ शिंदे" हे मनोज जरांगे पाटील --यांना समक्ष भेटायला का जात नाहीत ?


 श्रीपूर----- जेष्ठ पत्रकार

  बी.टी. शिवशरण

टाइम्स 45 न्युज मराठी

 मो.9579 177 671

                      जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेले सहा दिवस मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे त्या दरम्यान पोलिसांनी आंदोलनं करणाऱ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला आहे त्यात अनेकजण गंभीर जखमी झाले महिलांची डोकी फुटली सदर घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आंदोलन बंद मोर्चा निषेध जागोजाग होत आहेत अंतरवाली सराटी येथे अनेक राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी समक्ष भेट दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून काही मंत्री आमदार यांना मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे यासाठी त्यांना पाठवले आहे मात्र ते स्वतः उपोषण स्थळी मनोज जरांगे पाटील यांना भेटायला का जात नाहीत राज्यातील सध्याचे वातावरण तापले आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा वेळी राज्याचे प्रमुख म्हणून व नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन उपोषण करणार्या मराठा समाज बांधवांबरोबर सकारात्मक चर्चा करून उपोषण सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समक्ष भेट दिल्या शिवाय आंदोलनं थांबणार नाही






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा