इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल -8378081147
- उजनी धरणातून भिमा नदी पात्रात ५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. सदरचे पाणी सोलापूर, पंढरपूर, सांगोल्याला पिण्यासाठी सोडण्यात आले आहे.
उजनी धरणातून आज दुपारी दोन वाजता १६०० क्युसेक्सचा विसर्ग विज निर्मिती संचातून सोडण्यास सुरुवात करण्यात आली. सायंकाळी सहा वाजता त्यामध्ये वाढ करून ५ हजार क्युसेक्स करण्यात आला. सदरचे पाणी पंढरपूर, सांगोलासह सोलापूर शहराला पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. औज बंधाऱ्यात २९ सप्टेंबर रोजी पाणी पोहचणार आहे.
उजनी धरणाच्या पाच दरवाज्यातून ५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आले आहे. तसेच भिमा नदी काठावरील इंदापूर व माढा तालुक्यातील पिण्याच्या पाणी पुरवठा योजना बंद पडल्या होत्या त्या पुन्हा सुरू होणार आहेत. तसेच पाण्याचे पर्क्युलेशन वाढणार असल्याने अनेक विहिरी व बोअरला पाणी वाढणार आहे.
फोटो - उजनी धरणातून भिमा नदीपात्रात ५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
---------------------------





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा