Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३

अकलूज" डाळिंब मार्केट" ची ख्याती न्यारी ---

 अकलूज" डाळिंब मार्केट" ची ख्याती न्यारी ---       


      डाळिंबाचा भाव -450- रुपयावरी




अकलूजला म्हणती" डाळिंबाची पंढरी "            

                सोलापूर जिल्ह्याच्या नकाशावर अकलूज ही" सहकार नगरी".



संपादक----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9730 867 448

                      अकलूज डाळींब मार्केट ची ख्यातीच न्यारी..... डाळिंबाचा भाव 450 रुपयावरी.......... अकलुजला म्हणती "डाळिंबाची पंढरी"..... सोलापूर जिल्ह्याच्या नकाशावर अकलूज हे" सहकार नगरी" म्हणून नावारूपास आले आता त्याबरोबरच नव्याने अकलुज ची ओळख "डाळिंबाची पंढरी" म्हणून होऊ लागली आहे आजच येथील डाळिंब व्यापारी युसुफ रफिक बागवान यांचे अमन फ्रुट कंपनी या व मुन्नाभाई चौधरी यांचे बादशाह फ्रुट कंपनी या फर्मला अनुक्रमे गारअकोले येथील प्रगतशील शेतकरी श्री संतोष भागवत केचे यांचे भगवा जातीचे डाळिंबास अनुक्रमे 450 ₹ प्रति किलो, तर वालचंद नगर येथील प्रगतशील शेतकरी विशाल बोंद्रे यांचे त्याच डाळिंबास 400/—₹ प्रति किलो असा उच्चांकी दर मिळाला असून ऐन सणासुदीचे, गौरी ,गणपतीचे दिवसात ,त्यांचे आगमन प्रसंगी साडेचारशे रुपये दर मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे आसपासचे इंदापूर, माढा ,सांगोला, माण, फलटण, येथील बहुतांश शेतकरी वर्ग आपले डाळिंब अकलुज मार्केटला विक्रीस आणत आहे याप्रसंगी संतोष भागवत केचे, अमोल गायकवाड, वालचंद नगर येथील श्री विशाल बोंद्रे अकलुज बाजार कमिटीचेसचिव श्री काकडे, श्री उराडे साहेब तोलार व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने हजर होते येथील व्यापारी मनोज जाधव ,राजू भाई बागवान, अक्षय सोनवणे, सादिक बागवान, धनाजी घाडगे, सागर नागणे, मुन्नाभाई चौधरी ,जावेद भाई, युसुफ बागवान ,ज्ञानदेव कोकरे, तेजस पाटील, बालाजी इंगळे, नाथा पाटील अमोल जाधव, सरपंच भोसले, इ. सर्वच व्यापारी शेतकऱ्यांचा येणारा "चांगला माल..... चांगला दर "यास अनुसरून डाळिंब खरेदी स्पर्धात्मक रित्या करत आहेत वाढीव दर मिळाल्याने सणासुदीच्या काळात शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे त्यामुळे आसपासच्या परिसरात अकलूज ही "डाळिंबाची पंढरी। म्हणून नव्याने नावारुपास येत आहे या सर्व प्रगतीमागे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री- विजयसिंह मोहिते पाटील ,जयसिंह मोहिते पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती -मदनसिंह मोहिते पाटील ,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ,धैर्यशील मोहिते पाटील ,यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य तसेच प्रेरणा मिळते संस्थेच्या प्रगतीचे काम सभापती मदनसिंह मोहिते पाटील व सचिव राजेंद्र काकडे तसेच व्यापारी वर्ग, कर्मचारी वर्ग, शेतकरी वर्ग ,नेहमीच क्रियाशील असतात .




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा