Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३

महावितरण च्या हलगर्जी कारभारामुळे जीवघेणी ठरू लागले "गणेशगाव "ची वाट

 


गाणेशगाव ----प्रतिनिधी 

नुरजहाँ --शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

                           गणेशगांवमधील रुपनवर वस्ती येथे कॅनॉल पट्टी रस्त्यावर जमिनीपासून केवळ आठ ते नऊ फुट उंचीवर विद्युतवाहक तारा असल्यामुळे शेतक-यांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे.शेतकरी महिला डोक्यावर गवताचे ओझे घेऊन येताना या विद्युत वाहक तारेच्या खालून सहज किंवा बिनधास्तपणे येऊ शकत नाही.मोटारसायकल सहज जाऊ शकते परंतु बैलगाडी किंवा इतर कोणतेही मोठे वाहन या रस्त्यावरून तारा आडव्या येत असल्याने येऊ शकत नाही.अनावधानाने एखादे मोठे वाहन येथुन असल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेतातील माल बाहेर काढण्यासाठी शेतक-यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.या रस्त्यावरून वाहन घेऊन जाणे म्हणजे शेतकरी वर्गास यामराजास आमंत्रण देणे असेच आहे.मागच्या दोन महिन्यापासून या विद्युत वाहक ताराखाली आलेल्या दिसत आहेत परंतु इकडे महावितरणाचे पूर्णपणे दुर्लक्ष दिसत आहे.एखाद्याचा जीव गेल्यांनतर यांना जाग येणार का ? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा