पिरळे येथील समता माध्यमिक विद्यालय व भिवाई देवी ज्युनिअर विद्यालयात" शिक्षक दिन "साजरा
अकलूज------प्रतिनिधी
लक्ष्मीकांत कुरुडकर.
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.7020665407
पिरळे येथील समता माध्यमिक विद्यालय व भिवाई देवी जुनियर विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला
दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात व्याख्याते व लेखक चंद्रशेखर गायकवाड यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमास संस्थेचे सचिव माननीय श्री शिंदे साहेब तसेच माननीय मुख्याध्यापक दीपक शिंदे सर यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमास व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावरती व्याख्यान दिले व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड मनोगत व्यक्त करताना म्हणाले "भारतरत्न माजी राष्ट्रपती आणि शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना शिक्षणाबद्दल अतिशय जिव्हाळा होता शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडवून यावा यासाठी राधाकृष्णन आयुष्यभर प्रयत्नशील होते राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक होते. शैक्षणिक क्षेत्रातील केलेले चाळीस वर्षाचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो वास्तविक पाहता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आयुष्यात अनेक उच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले 1931 मध्ये नाईट फूड 1954 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्न आणि 1963 मध्ये ब्रिटिश रॉयल ऑर्डर ऑफ मेरिटचे मानद सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आले होते. राधाकृष्णन यांचा असा विश्वास होता की हे शिक्षक हे देशातील सर्वात बुद्धिवंत असावेत 1962 पासून त्यांचा जन्मदिवस भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो देशाच्या जडणघडणित शिक्षकांचे मोठे योगदान आहे. समाजाची प्रगती होण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे परंतु शिक्षणासोबत जो शिक्षण देतो त्याचा आदर करणे देखील गरजेचे आहे सर राधाकृष्णन यांना वाटायचं शिक्षणाबद्दल त्यांना अतिशय प्रेम होते समाजाची प्रगती ही शिक्षणामुळे होते असे त्यांचे विचार होते त्यामुळे देशांमध्ये सगळ्यांना सुशिक्षित करून प्रत्येकाला शिक्षणाबद्दल ज्ञान दिले पाहिजे. 1921 ते 1931 यादरम्यान कोलकत्ता विद्यापीठात त्यांना तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले राधाकृष्णन 1931ते 1936 मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू होते 1939 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतले ते 1948 पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले कोलकत्ता विद्यापीठ आणि बनारस विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठात काम पाहत असताना डॉक्टर राधाकृष्णन यांनी प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही कोलकत्ता विद्यापीठातील आठवडाभराचे अध्यापनाचे दिवस सांभाळून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस ते बनारस विद्यापीठाचे प्रशासकीय कारभार पाहत असत सुमारे वीस वर्ष त्यांनी अध्यापनाचे कार्य केले.
यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांचा सत्कार विद्यार्थ्यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक मा श्री दिपक शिंदेसरांनी केले तर सूत्रसंचलन प्राध्यापिका
मा सौ विद्या थोरात यांनी
केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा