इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मोबाईल-8378081147
समाजाप्रती कर्तव्य, निष्ठा, कार्यतत्परता व कामाप्रती वाहून घेणे ज्यामुळे त्यांच्या ऋणातून मुक्ततेसाठी काम करता येईल असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
पिंपरी बुद्रुक ( ता. इंदापूर ) ग्रामपंचायत च्या सरपंचपदी सौ भाग्यश्री सुदर्शन बोडके यांच्या निवडीबद्दल व चि. वैभव बापुराव नरुटे यांची मुंबई पोलीसपदी, हनुमंत कांबळे तसेच दत्तात्रय मोरे यांची पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्याबद्दल आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पिंपरी बुद्रुक गावच्या सर्व सुपुत्रांचा फेटा, शाल, श्रीफळ देऊन आमदार दत्तात्रय भरणे यांनी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी सरपंच श्रीकांत बोडके, सुदर्शन बोडके, पोलीस पाटील वर्धमान बोडके, हामा पाटील, बबन बोडके, संतोष सुतार, शहाजी बोडके, सोमनाथ बोडके, राहुल कांबळे, पोपट कांबळे, ग्रामसेवक गणेश लंबाते यांच्यासह पिंपरी परीसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - भरणेवाडी येथे पिंपरी बुद्रुक येथील सुपूत्रांचा सन्मान आमदार दत्तात्रय भरणे यांनी केला.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा