श्री .शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर च्या सन 2022/ 23 गळीत हंगामाचा 200 रुपये दुसरा हप्ता बँकेत वर्ग
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
श्री.शंकर सहकारी साखर कारखाना लि.सदाशिवनगर सन 2022-23 गळीत हंगामामध्ये 31 जानेवारी 2023 अखेर गळीतास आलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता प्रति मेट्रीक टन रुपये 200/- रु प्रमाणे आज दिनांक 04.09.2023 रोजी बॅकेत वर्ग करण्यात आला आहे. सन 2022-23 गळीत हंगामामध्ये गाळपासाठी आलेल्या ऊसाची बिले आतापर्यंत रक्कम रू 2300 प्रति मे टन प्रमाणे अदा झालेली आहेत. सन 2022-23 गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला अंतिम दर रक्कम रू 2511/- प्रति मे टन याप्रमाणे दिला जाणार असून उर्वरित ऊस बिलाची रक्कम दिवाळी पर्यंत ऊस उत्पादकांच्या खात्यावरती वर्ग केली जाणार असलेची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन . मिलिंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.सभासद तसेच ऊस उत्पादकांना सन 2022-23 गळीत हंगामातील एकूण एफ. आर. पी च्या 98% ऊस बिले अदा केली आहेत. तसेच सन 2015-16 गळीत हंगामातील प्रलंबित ऊस बिलाची 20% रक्कम तसेच ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांची गळीत हंगाम 2022-23 मधील कमिशन डिपॉझिट ची 50% रक्कम बँकेत वर्ग करणेत आलेली आहे. ऊस उत्पादकांनी कारखाना व्यवस्थापनावर पूर्ण विश्वास ठेवून येणाऱ्या 2023-24 च्या गळीत हंगामामध्ये जास्तीत जास्त ऊस गळीतासाठी देऊन सहकार्य करणेचे आवाहन यावेळी . कुलकर्णी यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा