पानवन ता.माण जि.सातारा येथील महिलेवर झालेल्या अत्याचारा विरोधात दि. 5 सप्टेंबर रोजी म्हसवड येथे निषेध मोर्चाचे आयोजन.
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
पानवन अत्याचार प्रकरण
विद्रोही दलित महासंघ,भारतीय दलित महासंघ,योद्धा प्रतिष्ठान,वंचित बहुजन आघाडी, दलित पँथर,यांच्या वतीने
उद्या म्हसवड येथे निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे.
पानवन ता.माण,जि.सातारा येथील शहिदा महादेव तुपे या महिलेवर झालेल्या अत्याचारा संदर्भात तमाम बहुजन आणि मातंग बांधवांच्या वतीने शासनाच्या निषेधार्थ मंगळवार ,दिनांक 5/9/2023 रोजी सकाळी 11.00 म्हसवड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले,छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत मोर्चा बस स्टँड येथे येणार आहे व त्या ठिकाणी सर्वांच्या वतीने निषेध व्यक्त करून निवेदन सादर करून मोर्चा संपविण्यात येणार आहे.तरी तमाम फुले,शाहु,आंबेडकर आणाभाऊ साठे यांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन
.बच्चन साठे,दादासाहेब लोखंडे,शेखरभैया खिलारे, पपुभाऊ मिसाळ,मिलनभैया लोखंडे,प्रमोद लोखंडे,समस्त मातंग समाज म्हसवड यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा