*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
19 ऑगस्ट हा दिवस "जागतिक फोटोग्राफर दिन "म्हणून साजरा केला जातो केवळ भारतातच नाही तर पूर्ण जगात हा -फोटोग्राफर दिन -साजरा केला जातो
छायाचित्रकार फोटोग्राफर यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि फोटोग्राफीचा छंद जोपासणाऱ्या लोकांसाठी हा दिन समर्पित असुन या दिनामुळे फोटोग्राफी क्षेत्रात तरुण प्रोत्साहित होतात या दिवसाची खास वैशिष्ट्य आहे
त्याच अनुषंगाने अकलूज येथे माळशिरस तालुका फोटोग्राफर संघटना व अकलूज शहर फोटोग्राफर संघटनेच्या वतीने ' चंदूकाका सराफ 'यांच्या शॉप च्या दालनात फोटोग्राफर दिन उत्साहात साजरा करण्यात आला
याप्रसंगी -माळशिरस तालुका फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ माने उपाध्यक्ष कादरभाई शेख दिलीप माने, ज्येष्ठ फोटोग्राफर संजय लोहकरे, गायकवाड मामा ,बंडूशेठ भालेराव , माऊली कुरुडकर, भारत जवंजाळ ,विशाल बोरकर नितीन बनकर, केदार लोहकरे,शिवा शिंदे, आदि फोटोग्राफर उपस्थित होते
प्रारंभी दिलीप माने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले
या फोटोग्राफर दिनानिमित्त सोमनाथ माने आणि दिलीप माने यांनी आपले मनोगत व्यक्त करून फोटोग्राफरचना मार्गदर्शन केले तसेच विक्रम फोटो स्टुडिओ यांच्या वतीने सर्व उपस्थित फोटोग्राफरचा सन्मान करण्यात आला.
*"टाइम्स 45 न्यूज मराठी- अकलूज" च्या वतीने सर्व फोटोग्राफर बंधूंना" जागतिक फोटोग्राफर "दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा