Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५

*निवडणूक आयोगाच्या पक्षपाती वर्तना विरोधात इंडिया आघाडी व काँग्रेस चा निशाना ---खा-प्रणिती शिंदे यांचा सहभाग*

 


संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

नवी दिल्ली, दिनांक, १९ ऑगस्ट २०२५

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या पक्षपाती वर्तनाविरोधात काँग्रेस पक्षाने आज संसद भवन परिसरात मोठे आंदोलन केले. नवी दिल्ली संसद भवन परिसरातील या आंदोलनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.


हातात फलक घेऊन व घोषणाबाजी करत काँग्रेस खासदारांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर कठोर शब्दांत टीका केली. "Vote Chor", "Election Omissioners" अशा घोषणांसह लोकशाही धोक्यात असल्याचा इशारा देण्यात आला.


निवडणूक आयोगाची निष्पक्षता हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. मात्र आज आयोग शासनाच्या दबावाखाली वागत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा लढा सत्तेसाठी नाही तर जनतेच्या मतदानाच्या हक्कासाठी आहे."


या आंदोलनात अनेक काँग्रेस, INDIA आघाडीचे खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संसद परिसरात घेतलेल्या या आंदोलनामुळे विरोधकांनी निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा