अकलूज--- प्रतिनिधी
केदार लोहोकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
आपल्या भारतभूमी जिथे पूजा विधी केवळ कृती नसतात तर परंपरेचा गूढ अर्थ मांडतात.जिथे पूजा केवळ समारंभ नसतो तर आत्मशुद्धीचा मार्ग असतो.पवित्र श्रावण मासानिमित सकल भाविक भक्तांच्या आयुर - आरोग्यासाठी व सुख समृद्धीसाठी श्री मल्लिकार्जुन महादेवास रूद्र अभिषेक,बिल्वार्चन आणि दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी श्री १०८ राजगुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज शिखर-शिंगणापूर व श्री १०८ ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज वाई या महास्वामींच्या दिव्यसानिध्यामध्ये अकलूजमध्ये संपन्न झाला.महाराजांची पद्यपूजा श्री व सौ सुनील जठार व श्री व सौ विजयराव टोंगळे यांनी केली.श्री वाईकर महाराजांनी समाजाने एकत्र राहून प्रगती करावी हे उदाहरणांमधून दाखवून दिले तर श्री शिंगणापूरकर महाराजांनी रुद्र पठण व रुद्र पूजेचे महत्व पटवून दिले व नित्य लिंगपूजा रुद्र पठण करावे असे सांगितले.या कार्यक्रमामध्ये ४० दांपत्यांनी रुद्र अभिषेकामध्ये सहभाग नोंदवला १०८ नामावली व बिल्वारचंन झाले.श्री मल्लिकार्जुन महादेवास श्री योगेश व सौ पूनम गुळवे दाम्पत्य व श्री सचिन व सौ ज्योती कथले यांनी रुद्र अभिषेक केला.महाआरती होवून कार्यक्रमाची सांगता झाली व आलेल्या सर्व शिवभक्तानी महाप्रसादाचा लाभ घेतला.सदर कार्यक्रमामधे महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था व वीरशैव लिंगायत समाज,अकलूज यांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.सदरच्या कार्यक्रमासाठी महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था,अकलूज यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा