श्रीपूर ---ज्येष्ठ पञकार
बी.टी.शिवशरण
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9527 456 958
शाहीन इरफान शेख यांना मुंबई महापालिका आदर्श महापौर शिक्षीका सन्मानाने शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे हस्ते गौरविण्यात आले आहे पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने मुंबईत मुंबई महापालिकेच्या वतीने आदर्श शिक्षक शिक्षीका महापौर सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात त्यांचा सत्कार करुन आदर्श शिक्षिका महापौर पुरस्कार देण्यात आला विशेष म्हणजे संपूर्ण मुंबई शहरात पहिला क्रमांक देण्यात आला आहे त्या इंग्लिश शाळेत शिक्षिका आहेत शाहीन शेख या श्रीपूर येथील मलंग चांदसाहेब शेख यांच्या सुनबाई आहेत त्यांचा मुलगा इरफान शेख हेही मुंबईत शिक्षक आहेत शाहीन शेख यांना मिळालेल्या पुरस्काराचे श्रीपूर परिसरात त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी यांनी कौतुक केले आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा