संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर येथे विद्यार्थीनींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्यांच्यातून नव्या पिढीचे वैज्ञानिक तयार व्हावेत, त्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास व्हावा असे विविध हेतू साध्य करणारे सूप्त गुणांना दिशा देणारे व्यासपीठ म्हणजेच शालेय विज्ञान प्रदर्शनाचे दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी आयोजन करण्यात आले होते .
शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी स्थानिक प्रशाला समिती सदस्य नवनाथ पांढरे ,महर्षी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवाजी पारसे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता गायकवाड, परीक्षक म्हणून माजी मुख्याध्यापिका सुजाता शेटे अकलाई विद्यालय अकलूज येथील विज्ञान शिक्षक राजेंद्रकुमार बनकर, ज्येष्ठ शिक्षक अनिल पिसे, नामदेव कुंभार, अर्जुन बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
विज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीसह सर्जनशीलतेच्या विकासाला चालना मिळते असे मत सहशिक्षक संतोष मगर यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले. विज्ञान-तंत्रज्ञान, कृषी गणित, भूगोल अशा विविध विषयावर विद्यार्थिनींनी 84 वैज्ञानिक उपकरणे प्रदर्शनामध्ये सादर केली .
शालेय प्रदर्शनाचे आयोजन करण्यासाठी अनिल पिसे, रचना रणनवरे, वर्षा भोसले ,धन्यता साखरे, वंदना काळे, गणेश दळवी, विशाल लिके इ. शिक्षकांनी मदत केली







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा