अकलूज -----प्रतिनिधी
केदार---लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
मो-9890 095 283
अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अकलूज येथे भव्य शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.माळशिरस तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांच्या हस्ते या विज्ञान प्रदर्शनाचे उद् घाटन करण्यात आले.
जिजामाता कन्या प्रशालेच्या इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थिनींनी सुमारे १७० पेक्षा जास्त विविध उपकरणे या प्रदर्शनात मांडली होती.भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रात मानाचा शिरपेच ठरलेल्या चांद्रयान-३ मोहिमेस विद्यार्थ्यांनी विशेष महत्त्व दिलेले आढळले. याशिवाय पर्यावरणाच्या समस्या भौतिकशास्त्रीय व जीवशास्त्रीय संशोधने रसायनशास्त्र गणित व भूमितीतील संकल्पना समजणे कामी अनेक नाविन्यपूर्ण उपकरणे विद्यार्थिनींनी तयार केली होती.या प्रदर्शनाचे परिक्षण करण्यासाठी ज्येष्ठ विज्ञान शिक्षक रामकृष्ण गुरव आणि श्रीकांत राजमाने उपस्थित होते.अकलूज केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख राजेंद्र जाधव तसेच श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय अकलूजचे प्राचार्य डॉ.राहुल सुर्वे,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनीता वाघ, पर्यवेक्षक यशवंतराव माने देशमुख तसेच विज्ञान प्रदर्शनमध्ये उपकरणांना मार्गदर्शन करणारे विज्ञान विषयाचे सुनिता वाघ, सुनिल कांबळे,दिपाली राजमाने,तानाजी भोसले,आशा निंबाळकर, राजश्री कणबूर,प्रल्हाद भोसले,विनोद बाबर,भिमराव सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व शिक्षक शिक्षकेतर आणि विद्यार्थिनी कार्यक्रमास उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी रुजवावा आणि भारताच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे अशी अपेक्षा याप्रसंगी प्रमुख पाहुणे देशमुख साहेब यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या प्रा.राणी केचे व सुनिता वाघ यांनी केले तर सूत्रसंचालन प्रल्हाद भोसले आणि रोहीत माने यांनी केले.आभार प्रदर्शन दिपाली राजमाने यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा