Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ७ जुलै, २०२५

*अरे वेड्यानो गांधी केवळ व्यक्ती नाही तो एक विचार आहे --जो विचार इंग्रजांच्या बंदुकीच्या गोळीने संपला नाही तो अशा विटंबनेने कसा संपणार --चेतन नरोटे*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

पुणे येथे एका माथेफिरू व्यक्तीकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या कृत्याचा निषेध करत व आरोपी तसेच अशा प्रवृत्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी खासदार मा. प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलिस आयुक्तालय सोलापूर शहर येथे पोलिस आयुक्त मा. एम. राजकुमार यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी बोलताना काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, पुणे रेल्वे स्थानकाजवळ महात्मा गांधींच्या पुतळ्यावर एका माथेफिरूने कोयत्याने हल्ला करून विटंबना केली. हा फक्त माथेफिरूपणा नाही, तर २०१४ पासून पेरल्या गेलेल्या गांधीद्वेषाच्या विषाचा परिणाम आहे. भाजप आणि त्यांच्या पिलावळींच्या छत्रछायेत खुनी गोडसेचं उदात्तीकरण, देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या, स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचा धादांत खोट्या इतिहासाचा जाणीवपूर्वक केलेला प्रचार आणि प्रसार, यामुळे अशी कृत्यं घडताहेत. गांधी विरोधी विचारधारा आज सत्तेत असली तरी गांधी विचार वाढतो आहे, म्हणून ही अशी भ्याड कृती रात्रीच्या अंधारात केली जात आहे. हा गांधीविरोध म्हणजे फक्त गांधींचा अपमान नाही, तर भारताच्या आत्म्यावर हल्ला आहे. पंच्याहत्तर वर्षांनीही गांधी या नावाची देशद्रोह्यांच्या मनात अजूनही किती भीती आहे याचं प्रतिक म्हणजे ही विटंबना, अरे वेड्यांनो गांधी ही केवळ व्यक्ती नाही, विचार आहे. जो विचार बंदुकीच्या गोळीने नाही संपला तो अशा विटंबनेने कसा संपणार ? गांधी अमर आहेत आणि राहतील. दुर्दैवाने, भारतात आज नथुराम पुन्हा जन्मतो आहे. आत्ता मनुवादी वृत्तीला आव्हान देण्याची वेळ आली आहे.



यावेळी माजी महापौर अरिफ शेख प्रदेश सचिव विनोद भोसले, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, माजी नगरसेविका फिरदोस पटेल, परवीन इनामदार, अब्दुल खलीक मुल्ला, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, ग्राहक संरक्षण सेल अध्यक्ष वैभव पाटील, सुशिक्षित बेरोजगार सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड, उपाध्यक्ष अनिल मस्के, हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, रफिक इनामदार, लखन गायकवाड, परशुराम सतारेवाले, गिरिधर थोरात, दिनेश म्हेत्रे, भीमराव शिंदे, ज्योती गायकवाड, रेखा बिनेकर, सागर उबाळे, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, श्रीशैल रणधीरे, राजेश झंपले, लतीफ शेख रजाक कादरी, नूर अहमद नालवार, शिवाजी साळुंखे, सुनील डोळसे, व्यंकटेश बोमेन, शोभा बोबे, सलीमा शेख, पूजा चव्हाण, छाया हिरवटे, अनिता भालेराव, चंद्रकांत टिक्के, आकाश कांबळे, रुपेश साबळे, धनंजय पाळेकर, रुबी गुंड, विजय बालनकर, आनंद समारंभ, साई शिंदे, अभिलाष अच्युगटला यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा