संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
अकलूज. ता. १६ : येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च,शंकरनगर -अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि.१६/०९/२०२३ रोजी द्वितीय व तृतिय वर्ष मेकॅनिकल पदविका मधील विद्यार्थ्यांची शिक्षक - पालक सभा संपन्नझाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी केले. त्यामध्ये त्यांनी महाविद्यालयाचे अध्यक्ष, संचालक, सचिव, शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी यांच्यातर्फे सर्व पालकांचे स्वागत केले.
पालकसभे मध्ये पालकांना विद्यार्थ्यांचा पहिल्या सेमिस्टर मधील सर्व विषयांचा शैक्षणिक आढावा घेण्यात आला व पुढील येणाऱ्या सर्व परीक्षा , अभ्यास व्यतिरिक्त इतर उपक्रम याबद्दल माहिती देण्यात आली. पालकांनी बोलताना शैक्षणिक व इतर उपक्रम बद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना विभाग प्रमुख प्रा.स्वप्नील निकम यांनी पालक - शिक्षक व विद्यार्थी यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे असे नमूद केले तसेच वर्षभरामध्ये होण्याऱ्या सर्व शेक्षणिक तसेच इतर घडामोडी याबद्दल पालकांना अवगत केले .प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी सर सर्व पालकांचे सूचनेचे निरसन केले व येणाऱ्या कालावधी सर्व विद्यार्थ्यांना आपण चांगले इंजिनियर, उद्योजग बनवु असा विश्वास त्यांनी दिला.
कार्यक्रमास मेकॅनिकल पदविका मधील पालक शिक्षक - प्रा.रवी देशमुख, प्रा.योगेश शेटे,प्रा. वैभव पांढरे,प्रा. नाना काळे , शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.वैभव पांढरे यांनी काम पाहिले ,
सूत्र संचालन म्हणून प्रा.योगेश शेटे यांनी काम पहिले तसेच प्रा.रवी देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा