सातारा जिल्ह्यातील ,पानवन प्रकरण संदर्भात दलित महासंघा ची पालकमंत्री "शंभूराजे देसाई" यांच्याशी चर्चा पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्याबाबत आश्वासन.
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामधील पानवन या गावांमध्ये शहिदा महादेव तुपे व तिच्या कुटुंबीयास गावातील लोणारी सवर्ण समाजातील जातीवादी व गावगुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून अमानुष मारहाण करण्यात आली होती. यामध्ये म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस प्रमुख राजकुमार भुजबळ साहेब यांनी अत्यंत निरपेक्ष भूमिका घेऊन तातडीने चार प्रमुख आरोपींना अटक केली होती. परंतु त्यातील रोहिदास नरळे हा आरोपी फरार होता. दलित महासंघाने घेतलेल्या भूमिकेमुळे म्हसवड पोलीस स्टेशनने फरार आरोपीलाही तात्काळ अटक केली. असे असले तरी, दलित,आदिवासी, अल्पसंख्यांक किंवा महिला वरील अत्याचाराच्या घटना या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या असतात. म्हणूनच अशा प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई होण्याबरोबरच पीडित कुटुंबीयांना न्याय मिळणे ही आवश्यक असते. त्या दृष्टिकोनातून दलित महासंघाच्या शिष्टमंडळाने आज सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार शंभूराजे देसाई यांची भेट घेतली व पानवन प्रकरण पालकमंत्र्यांना सविस्तर कथन केले. नामदार शंभूराजे देसाई यांनी पीडित कुटुंबाची व्यथा ऐकून सदर कुटुंबाचे पुनर्वसन करण्याबाबतचे आश्वासन शिष्टमंडळास दिले असून तशा पद्धतीने कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारचे जिल्हा प्रशासनाला आदेशही दिले आहेत.
सदर शिष्ट मंडळामध्ये प्रा. मच्छिंद्र सकटे, प्रा. पुष्पलता सकटे, पीडित महिला शहिदा महादेव तुपे, भोजलिंग महादेव तुपे, हनुमंत लोखंडे, विनायक तुपे, युवराज तुपे, राहुल तुपे तसेच बबन भिसे, गणेश भिसे, मधुकर भिसे, विलास गायकवाड, बुवा सकट आदींचा सहभाग होता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा