जालना मराठा आरक्षण लाठीहल्ला निषेधार्थ माळशिरस तालुक्यातील पूर्व भागात 25/4 येथे उद्या चक्काजाम व रास्ता रोको.
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत उपोषण करणाऱ्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावांमध्ये मराठा समाज बांधवावर अमानुषपणे गोळीबार व लाठी हल्ला केलेल्या प्रकरणी निषेधार्थ मंगळवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी माळशिरस तालुक्यात आठ ठिकाणी चक्काजाम करून माळशिरस तालुका सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचा निर्णय सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने 3 सप्टेंबर रोजी घेण्यात आला
तरी लवंग , वाघोली, वाफेगाव, बाभुळगाव, संगम, गणेशगाव, तांबवे, महाळुंग या पंचक्रोशीतील सर्व मराठा समाज बांधवांनी 25 4 लवंग या ठिकाणी दिनांक पाच सप्टेंबर मंगळवारी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहून नऊ ते अकरा रस्ता रोको करून चक्काजाम करण्याचे ठरले आहे तरी सर्व मराठा समाज बांधवांना विनंती मराठा समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही सकल मराठा समाजाच्या वतीने विनंती
आयोजक सकल मराठा समाज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा