श्री संत सेना महाराजांनी व्यवसायालाच परमार्थाचे रूप देऊन समाज घडवला - राम महाराज शेळके
इंदापूर तालुका......
प्रतिनिधी एस.बी. तांबोळी,
मोबाईल -8378081147
: आपण कोणत्या जातीत जन्माला यावे, हे आपल्या हातात नाही, परंतु ज्या जातीत जन्माला आलो, त्या जातीची प्रतिष्ठा वाढविणे, हे आपल्या हातात आहे. श्री संत सेना महाराजांनी व्यवसायालाच परमार्थाचे रुप देऊन समाज मनाला विवेक दर्पण दाखवून देण्याचे काम केले असे प्रतिपादन राम महाराज शेळके यांनी केले.
नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांची ६५३ वी पुण्यतिथी सोहळा पिंपरी बुद्रुक नाभिक समाजाच्या वतीने (सोमवारी, ११ सप्टेंबर) रोजी संपन्न झाला. यावेळी भजनी मंडळाकडून मंत्रमुग्ध कीर्तन, भजन, महाप्रसाद आदि कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी झाली. यावेळी ह.भ.प. राम महाराज शेळके कीर्तनात बोलत होते.
श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी बुद्रुक, गारअकोले, गिरवी, ओझरे, गोंदी येथील भजनी मंडळी व सर्व नाभिक समाज बांधव व महिला उपस्थित होत्या. यावेळी महादेव सुतार, महेश काशिद, राजेंद्र शेलार, शशिकांत सूर्यवंशी, चक्रधर सूर्यवंशी, विष्णू सूर्यवंशी आदी उपस्थित होते. नागनाथ काशिद यांनी सर्व वारकरी व समाज बांधवासाठी फराळ व महाप्रसादची व्यवस्था केली.
---------------------------







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा