*कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे तीन अधिकार्यांना पुरस्कार जाहीर
श्रीपूर ---ज्येष्ठ पञकार
बी.टी.शिवशरण
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9527 456 958
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास गळीत हंगाम 2022 23 साठीच्या सर्वोत्कृष्ट को जनरेशन प्रकल्प या पुरस्काराने तसेच कारखान्याच्या को जन मॅनेजरसह इतर तीन अधिकाऱ्यांना को जन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे सदर पुरस्काराचे वितरण शनिवार दिनांक 16.9.2023 रोजी पुणे येथे होणार आहे
यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास प्रत्येक वर्षी विविध पुरस्काराने सन्मानित केले जात आहे मागील अनेक वर्षापासून कारखान्याला अनेक पुरस्कार मिळाले असुन याही वर्षी को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या नामांकित संस्थेकडून को जनरेशन प्रकल्पामध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे प्रकल्पाच्या क्षमतेनुसार जास्तीत जास्त वीज निर्मिती करून जास्तीत जास्त वीज एम. एस. ई .बी .ला विक्री केल्यामुळे व संपूर्ण गळीत हंगामातील कामाचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सहकारी को जनरेशन प्रकल्प म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे त्याचबरोबर कारखान्याचे कोजन मॅनेजर सचिन विभुते यांना बेस्ट को जनरेशन मॅनेजर हा स्पेशल पुरस्कार मिळाला आहे . इन्स्ट्रुमेंट मॅनेजर श्री समीर सय्यद यांनाही बेस्ट इन्स्ट्रुमेंट मॅनेजर, श्री बाळासाहेब गोरे वेस्ट इलेक्ट्रिक मॅनेजर म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत तसेच ईटीपी मॅनेजर म्हणून पांडुरंग कारखान्याचे सत्यवान जाधव यांना सन्मानित केले जाणार आहे सदर पुरस्काराचे वितरण हे दिनांक 16 9 2023 रोजी पुणे येथील टीप टॉप हॉटेल येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार आणि संस्थेचे अध्यक्ष मा खासदार शरदचंद्र पवार व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे
को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेकडून मिळालेल्या पुरस्काराने कारखान्याच्या पुरस्कारात भर पडली असून यानंतरही असेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार कारखान्याच्या उत्तुंग कामगिरीमुळे मिळतील
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास बेस्ट को जनरेशन पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन मा आ श्री प्रशांतराव परिचारक मालक व्हा चेअरमन कैलास खुळे , सर्व संचालक अधिकारी यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ यशवंत कुलकर्णी तसेच कारखान्याचे कोजन मॅनेजर सचिन विभुते इन्स्ट्रुमेंट मॅनेजर समीर सय्यद बेस्ट इलेक्ट्रिक मॅनेजर श्री बाळासाहेब होरे तसेच ईटीपी मॅनेजर श्री सत्यवान जाधव यांचे अभिनंदन करून पुढील कारकीर्दस शुभेच्छा दिल्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा