Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३

अकलूज येथे राष्ट्रीय महापोषण अभियान संपन्न

 अकलूज येथे राष्ट्रीय महापोषण अभियान संपन्न


विशेष प्रतिनिधी---

कासिम मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

  

                दि.1 ते 30 सप्टेंबर पोषण माहच्या निमित्ताने सुपोषित भारत, साक्षर भारत, सशक्त भारत या राष्ट्रीय महापोषण अभियान अंतर्गत मा.पंतप्रधान यांच्या सुपोषित भारत या संकल्पनेवर आधारीत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अकलूज, विभाग माळीनगर-2 मधील अंगणवाडी दत्त चौक 1, 2, 3, 4, किल्ला शाळा 1, 2, अंबाबाई रोड 1, 2, नविन बाजारतळ, गांधी चौक, दत्तनगर-1 यांच्या वतीने घेण्यात आला.



या कार्यक्रमात उपस्थित पालकांना पोषण आहार, बाळ कोपरा, कुपोषण व आरोग्य विषयक माहिती देण्यात आली. पोषण आहाराबद्दल माहिती सांगताना अरूंधती हजारे यांनी सांगितले की, बालकांना आहार देताना प्रथिनेयुक्त, लोहयुक्त, कर्बोदकेयुक्त व फळांचा वापर करावा व बाळ आजारी पडू नये यासाठी बाळाच्या आरोग्याची काळजी घ्यावी व वजन वाढीकडे लक्ष द्यावे त्यासाठी योग्य पुरक आहार देवून कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.



लिनेन्स क्लब च्या संगिता दोशी यांनी हल्ली मुलांना खाऊ घालताना माता सहसा मोबाईल दाखवून आहार खाऊ घालतात. त्याचा दुष्परिणाम बालकांच्या आरोग्यावर नक्कीच होतो. त्यासाठी बालकांना आहार खाऊ घालताना मुलांशी गप्पा मारत त्यांना काही गोष्टी, कथा सांगत खाऊ भरवण्याचे सांगितले. मोबाईलच्या वापरामुळे मुलांच्या मेंदूवर होणारा दुष्परिणाम याबद्दलही माहिती सांगितली.


जयश्री मिसाळ यांनी बाळ कोपरा याबद्दल माहिती सांगताना लहान मुलांच्या हाताला येईल असा घरात एक कोपरा करून त्यामध्ये शेंगदाणा लाडू, राजगिरा लाडू, चुरमुरे, फुटाणे अशा वस्तू पारदर्शक भरणीमध्ये बाळाला दिसतील व बाळाला भुक लागेल तेंव्हा तो सहज घेऊन खाईल असा बाळ कोपरा तयार करण्यास सांगितले.


या कार्यक्रमात अंगणवाड्यांच्या पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत 30 महिला पालकांनी सहभाग घेतला. यातील सहभागी स्पर्धकांना लिनेन्स क्लब, अकलूज यांच्या वतीने बक्षीस वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमासाठी प्रकल्प अधिकारी श्री.बालाजी अल्लडवार सर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी वासुदेव सर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी पर्यवेक्षिका आर.के. कदम मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माळीनगर 2 मधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सहकार्य केले. अरूंधती हजारे यांनी सुत्रसंचालन केले तर जयश्री मिसाळ यांनी आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा