इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मोबाईल -8378081147
: पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथे रामायण ग्रंथाचे अर्थासहित वाचन चालू आहे. दररोज रामायण वाचनानंतर आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात येते. त्यानिमित्त सर्व धर्मियांना आरतीचा मान देऊन जातीच्या भिंती तोडल्याने ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) ग्रामस्थांच्या वतीने रामायण ग्रंथाच्या कथेचे वाचन करण्यात येत आहे. दररोज नित्यनियमाने सायंकाळी येथील विठ्ठल मंदिरात रामायण ग्रंथाचे अर्थासहित वाचन चालू आहे. रामायण कांड समाप्तीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
सदर रामायणाचे आयोजन पोलिस पाटील वर्धमान बोडके, अशोक बोडके, बाळासाहेब घाडगे, संदीपान पडळकर, भोसले आबा, बाळासाहेब मगर, महादेव सुतार, सोमनाथ सुतार, नागनाथ काशीद आदी ग्रामस्थांनी केले आहे.
दरम्यान, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज श्री गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहूकर व श्री गुरुवर्य सोहम महाराज देहूकर यांनी मंदिरामधील रामायण पारायण वाचनास भेट दिली.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा