फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल 25/4 लवंग येथे दहीहंडी उत्सव साजरी
गणेश गाव प्रतिनिधी
टाइम्स 45 न्युज मराठी
नुरजहाँ ---शेख
कृष्ण जनमोत्सव साजरा करण्यासाठी या शाळेतील चिमुकल्या बाळगोपालानी श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान केली होती तर शर्वरी शेखर रेडे या मुलीने रधिकेची वेशभूशा परिधान करून तिचा सखा कृष्णा बरोबर नृत्य सादर केले तसेच नटख्ट कृष्ण कन्ह्या ची वेशभूषा परिधान केलेले प्रियांश गायकवाड ,अर्जुन निखिल चव्हाण ,विराट मिटकल .यांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. राधा कृष्ण च्या वेशातील ही चिमुकली मुले अतिशय सुंदर मनमोहक दिसत होती या बालकांच्या अंगभूत नटखट लीलांचे दर्शन यावेळी उपस्थितांना पहावयास मिळाले . दहीहंडी उत्सवा मुळे विद्यार्थ्यांना संगठन कौशल्य आत्मसात होते .संघटित राहण्याची भावना बालमनात रुजते सहकार्याची ,एकमेकांना मदतीची भावना निर्माण होते आणि एकात्मते च्या विचारांना खातपणी मिळते पारंपरिक सन उत्सवाची माहिती मिळते व आपल्या संस्कृतीची व संस्काराची रुजवणूक होते .
उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण अशी आदर्श शाळा म्हणून पंचक्रोशीत नवलौकिक मिळवलेली अल्पावधीत नावारूपास आलेली ही शाळा ज्ञानार्जना सोबत बालकांच्या सुप्त गुणांना वाव देऊन एकात्मतेचे धडे गिरवीत आजचे बालक उद्याचे उत्तम नागरिक व्हावेत यासाठी सदैव प्रयत्नशील असणारी ही शाळा गावाकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा